पंचवटी : ज्या मातेने जन्म दिला अन् १४ महिने वाढविले त्याच मातेने आपल्या तान्हुलीच्या गळ्यावर ब्लेडने घाव घालून ठार मारल्याच्या संशयावरून पोलिसांनी अटक केलेल्या चिमुकलीच्या आईला पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून अटक केली. संशयित योगित पवारला गुरूवारी (दि.१८) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.गेल्या मंगळवारी (दि.१६) दुपारी आडगाव शिवारातील औरंगाबादरोडवर साई पॅराडाईझ इमारतीत राहणार्या योगिता मुकेश पवार या मिहलेने १४महिन्यांच्या स्वरा नामक मुलीच्या गळा व हातावर ब्लेडने वार करून जीवे ठार मारले होते. यानंतर स्वत:च्या हातावर ब्लेडने वार करत घरात एक चोरटा चोरीच्या उद्देशाने घरात घुसला त्याने चाकूचा धाक दाखवून माङयाकडे दागिने मागून स्वरा व माझ्यावर वार करून पळून गेला असे पोलिसांना सांगितले होते. सदर घटनेनंतर पोलिस चक्र ावून गेले. घटनास्थळी पोलीस अधिकारी, श्वान पथक, वैज्ञानिक न्यायसहायक पथक दाखल झाले होते. त्यांनी घरातून ठसे व काही वस्तूंची तपासणी करत परिस्थितीजन्य पुराव्यांअधारे संशयित योगिताला अटक केली.संशियत महिला सांगत असलेली कहाणी व प्रत्यक्ष घटना यात साम्य नसल्याची पोलिसांची खात्री पटली. खून प्रकरणी त्या बलिकेचा पिता मुकेश पवार याने पोलिसात अज्ञात व्यक्तीविरूध्द तक्र ार दाखल केली होती. गुरु वारी दुपारी योगिता पवार हिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.पोलिसांना घटनास्थळी जे पुरावे आढळून आले त्यानुसार प्रथम दर्शनी आरोपी त्या बलिकेची माता असल्याचे समोर आले आहे; मात्र चिमुकलीचा खून का केला हे अद्याप उघड झालेले नाही, पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.
बलिकेच्या खून प्रकरणी त्या मातेला तीन दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 17:01 IST
गेल्या मंगळवारी (दि.१६) दुपारी आडगाव शिवारातील औरंगाबादरोडवर साई पॅराडाईझ इमारतीत योगिताने १४महिन्यांच्या स्वरा नामक मुलीच्या गळा व हातावर ब्लेडने वार करून जीवे ठार मारले होते.
बलिकेच्या खून प्रकरणी त्या मातेला तीन दिवसांची पोलीस कोठडी
ठळक मुद्दे परिस्थितीजन्य पुराव्यांअधारे संशयित योगिताला अटक चिमुकलीचा खून का केला हे अद्याप उघड झालेले नाही