मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यातून वाचविले मोराचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 17:43 IST2019-06-25T17:42:40+5:302019-06-25T17:43:17+5:30
सिन्नर : तालुक्यातील खोपडी जवळील दत्तमंदिर परिसरात पक्षीप्रेमींनी मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात सापडलेल्या मोरास वाचवून जीवदान दिले.

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यातून वाचविले मोराचे प्राण
खोपडी जवळील दत्तमंदिर परिसरात सात ते आठ मोकाट कुत्र्यांनी दोन मोरावर हल्ला केला असता एक मोर जखमी झाला तर दुसरा कुत्र्यांच्या हल्ल्यातून पळून जाण्यास यशस्वी ठरला. पंडित दराडे यांनी मोरावर झालेला हल्ला पाहिल्यानंतर त्या मोराला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले. यावेळी बाळासाहेब दराडे, गणेश दराडे, मनोहर पवार, वैभव दराडे, राजू दराडे यांच्या मदतीने जखमी मोरास घरी आणले. मोराच्या पायाला दुखापत झाल्याने दराडे यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यास दुरध्वनीद्वारे संपर्क केला असता, त्यांनी येण्यास टाळाटाळ केल्याने त्यांनी जखमी मोरावर घरगुती उपचार केले. त्यानंतर वनविभागाच्या अधिवासात सोडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी महादू शिंदे, डावखर यांच्या ताब्यात दिले. या परिसरात मोरांचे प्रमाण जास्त आहे. अशातच एक मोर पाण्यासाठी वणवण करीत असतांना कुत्र्यांच्या तावडीत सापडला. त्यास स्थानिक तरूणांनी औषध उपचार करून वनविभागाच्या स्वाधीन केले.