शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

महापालिकेचे घरपट्टी, पाणीपट्टीचे उद्दिष्ट अपूर्णच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 1:25 AM

घरपट्टीत दीडशे कोटी आणि पाणीपट्टीत ५५ कोटी रुपयांचे उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या महापालिकेच्या पदरी निराशा आली असून, घरपट्टीत ११४ कोटी रुपये, तर पाणीपट्टीत ४४ कोटी रुपये शनिवारपर्यंत वसूल झाले आहेत.

नाशिक : घरपट्टीत दीडशे कोटी आणि पाणीपट्टीत ५५ कोटी रुपयांचे उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या महापालिकेच्या पदरी निराशा आली असून, घरपट्टीत ११४ कोटी रुपये, तर पाणीपट्टीत ४४ कोटी रुपये शनिवारपर्यंत वसूल झाले आहेत. रविवारी एका दिवसात मोठ्या प्रमाणात उद्दिष्टपूर्तीची शक्यता नसल्याने आर्थिक नियोजन घसरण्याची शक्यता आहे.गेले वर्षभर महापालिकेत करवाढीचा विषय गाजला होता. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घरपट्टीत वाढ केली तसेच वार्षिक करमूल्यात आणि मोकळ्या जागेवरील कर आकारणीत करवाढ केली. त्यामुळे वर्षभरात २५६ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु करवाढीस मोठ्या प्रमाणात विरोध झाला. मुंढे यांच्या बदलीनंतर राधाकृष्ण गमे यांनी कार्यभार स्वीकारला आणि करवाढीचा गुंता न सुटल्याने सुधारित उद्दिष्ट दीडशे कोटी रुपयांचे दिले.परंतु घरपट्टी विभाग तेदेखील पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. शनिवारपर्यंत ११३ कोटी १३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. रविवारचा एक दिवस हातात असला तरी एक दोन कोटी रुपयांचे उत्पन्नच जेमतेम वाढू शकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.दरम्यान, पाणीपट्टीसाठी ५५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ४४ कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यामुळे या विभागाचेदेखील उद्दिष्ट पूर्ण होऊ शकलेले नाही.अधिकारी गायबसर्व शासकीय कार्यालयांमध्ये मार्चअखेरीस वसुलीचा जोर असतानाही महापालिकेत मात्र लेखा विभाग आणि पाणीपट्टी वसुली विभागाचे प्रमुख अनुपस्थित होते. लेखाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी, तर पाणीपट्टी वसुली विभाग ज्यांच्याकडे आहे असे भुगयोचे अधीक्षक अभियंता हे नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर गेल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTaxकर