मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 13:19 IST2023-03-14T13:19:31+5:302023-03-14T13:19:58+5:30
डॉ. सपना ठाकरे यांचा जन्म प्रतापपूर ता.साक्री येथे ४ जुलै १९७९ ला झाला

मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांचे निधन
मालेगाव (जि. नाशिक) : येथील महानगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना हरीश ठाकरे (४२) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांचेवर नाशिक येथे उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सासू सासरे असा परिवार आहे. येथील शिवाजीनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ. सपना ठाकरे यांचा जन्म प्रतापपूर ता.साक्री येथे ४ जुलै १९७९ ला झाला. त्यांनी बोराडी आयुर्वेद महाविद्यालयातून वैद्यकीय पदवी घेतली. मालेगावच्या निमा नागरी आरोग्य केंद्रात १४ वर्षे सेवा दिली. त्यांनतर २०१९ मध्ये मनपात वैद्यकीय अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. २०२० मध्ये कोरोना काळात प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केले. अनेकांना कोरोना काळात मदत केली. कोरोना काळात उत्तम आरोग्य व्यवस्था सांभाळली. पोषण आहाराची जबाबदारी सांभाळली.