शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेने तब्बल सव्वाशे मिळकती केल्या सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 01:00 IST

खासगी संस्था आणि राजकीय नेते यांच्या ताब्यात असलेल्या शहरातील मिळकती महापालिकेने ताब्यात घेण्यास प्रारंभ केला असून, तीन दिवसांत सव्वाशे मिळकतींना सील करण्यात आल्याचे वृत्त आहे त्यातील सिडको विभागातील सुमारे चाळीस मिळकतींचा समावेश आहे.

नाशिक : खासगी संस्था आणि राजकीय नेते यांच्या ताब्यात असलेल्या शहरातील मिळकती महापालिकेने ताब्यात घेण्यास प्रारंभ केला असून, तीन दिवसांत सव्वाशे मिळकतींना सील करण्यात आल्याचे वृत्त आहे त्यातील सिडको विभागातील सुमारे चाळीस मिळकतींचा समावेश आहे.  दरम्यान, महापालिकेच्या उत्साही अधिकाऱ्यांनी कार्यरत असलेल्या अभ्यासिकांमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढून काही मिळकती सील केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तथापि, ही चूक दुरुस्त करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या मालकीच्या ९०३ मिळकती आहेत. त्यातील समाजमंदिरे, अभ्यासिका आणि व्यायामशाळांसारख्या मिळकती महापालिकेने खासगी संस्थांना दिल्या आहेत. परंतु अनेक मिळकतींचा वापर होत नाही तर अनेक मिळकतींचा नियमबाह्य पद्धतीने व्यावसायिक वापर सुरू आहेत. काही मिळकतींचे तर महापालिकेबरोबरचे भाडेकरार आणि महासभेचे ठरावदेखील उपलब्ध नाहीत. किंंबहूना काही फाइलीच गहाळ झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने अशा मिळकतींना गेल्याच महिन्यात नोटिसा बजावल्या होत्या आणि गेल्या तीन दिवसांपासून मिळकती ताब्यात घेण्यास प्रारंभ झाला आहे. विभागीय अधिकाºयांमार्फत सुरू असलेल्या या कारवाईमुळे राजकीय नेते आजी-माजी नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. महापालिकेच्या अधिकाºयांनी उत्साहाच्या भरात अनेक मिळकती सील केल्या असून, त्यात कार्यरत असलेल्या समाजमंदिर, व्यायामशाळा आणि अभ्यासिकांचादेखील समावेश आहे. या चुका दुरुस्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सदरची मोहीम सुरूच राहणार आहे.  महापालिकेने बंद पडलेल्या, करार नसलेल्या आणि अन्य मिळकती सील करण्यास प्रारंभ केला आहे. त्यासंदर्भात अगोदरच संबंधितांना नोटिसा बजावल्या होत्या. काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कार्यरत मिळकती सील केल्याच्या तक्रारी असून, या चुका दुरुस्त केल्या जातील.- रोहिदास दोरकूळकर, उपआयुक्त, मनपा

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका