शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या शहर बससेवेचा आज फैसला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 01:27 IST

गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या शहर बस वाहतूक ताब्यात घेण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडलेल्या प्रस्तावावर बुधवारी (दि. १८) विशेष महासभेत फैसला होणार आहे. खासगीकरणातून ठेकेदारामार्फत सेवा चालविण्यास देताना आयुक्तांनी परिवहन समितीची तरतूद न केल्याने नाराज झालेल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील मिळाल्याने आता बससेवेचा मार्ग जवळ जवळ मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा परिवहन सेवेला हिरवा कंदीलविरोधी पक्ष मात्र भूमिकेवर ठाम

नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या शहर बस वाहतूक ताब्यात घेण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडलेल्या प्रस्तावावर बुधवारी (दि. १८) विशेष महासभेत फैसला होणार आहे. खासगीकरणातून ठेकेदारामार्फत सेवा चालविण्यास देताना आयुक्तांनी परिवहन समितीची तरतूद न केल्याने नाराज झालेल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील मिळाल्याने आता बससेवेचा मार्ग जवळ जवळ मोकळा झाला आहे. तथापि, महापालिकेकडे पैसे नाही म्हणून नागरिकांवर कर लादणाºया प्रशासनाकडून नसलेली जबाबदारी घेण्यास विरोधी पक्षांनी मात्र विरोध कायम ठेवला आहे.गेल्या पाच वेळा महापालिकेने बससेवेचा प्रस्ताव फेटाळला असताना यंदा सहाव्यांदा हा प्रस्ताव राज्य सरकारच्याच स्वारस्यातून मांडला जात आहे. महापालिकेत भाजपाची पूर्ण सत्ता असल्याने हा प्रस्ताव मंजूर होणे जवळपास अटळ आहे. मात्र, यासंदर्भात परिवहन समितीचा समावेश भाजपा करणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सादर केलेल्या बससेवेच्या प्रस्तावात परिवहन समितीची तरतूद नसून त्यामुळे सोमवारी (दि. १८) भाजपाच्या पक्ष बैठकीत खडाजंगी झाली होती. त्यामुळे आयुक्त मुंढे यांच्याशी चर्चा करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यांनी परिवहन समितीस नकार दिल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांची मंगळवारी सकाळी भेट घेण्याचे ठरले होते. त्यानुसार शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी यांच्या नेतृत्वाखाली उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, सभागृह नेता दिनकर पाटील, गटनेता संभाजी मोरूस्कर तसेच भगवान दोंदे, पंडित आवारे, सुनीता पिंगळे, जगदीश पाटील, अनिल भालेराव यांनी सकाळी मुंबई गाठून पालकमंत्र्यांची भेट घेतली; मात्र त्यांनी या विषयावर मुख्यमंत्र्यांशीच चर्चा करा असे सांगून संबंधिताना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनीबससेवेचा प्रस्ताव जर नियमात बसत असेल आणि अन्य महापालिकांमध्ये अशाच प्रकारची तरतूद असेल तर तसा निर्णय घेण्याची मुभा दिली आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीअंतर्गत मखमलाबाद शिवारात नगररचना योजना राबविण्यास शेतकºयांचा विरोध असल्याचे सानप आणि अन्य पदाधिकाºयांनी सांगितल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांची समजूत काढावी व ते शक्य न झाल्यास पर्यायी जागा शोधावी, असा सल्ला दिला. त्यामुळे आता बुधवारी होणाºया सभेत बससेवा सुरू करण्याचा फैसला होण्याची शक्यता आहे.विरोधकांचा विरोध कायममहापालिकेतील विरोधी पक्षांनी शहर बस वाहतुकीच्या प्रस्तावाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. या बससेवेत अनेक त्रुटी असून, या दूर करून प्रस्ताव सादर करावा अशी मागणी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी केली आहे. बससेवेच्या बाबतीत आयुक्तांचा प्रस्ताव दोषपूर्ण आहेत. त्यात अनेक त्रुटी आहेत, त्याचबरोबर खासगीकरणाचे महापालिकेचे अनुभव अत्यंत वाईट आहेत. खत प्रकल्पापासून घंटागाडीपर्यंत अनेकदा महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला असताना अशाप्रकारची सेवा राबविणे गैर असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले.सभागृह नेते पाटील नाराजचपालकमंत्री गिरीश महाजन यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी स्मार्ट सिटीविषयी पुरेशी कल्पना नसल्याचे सांगून महापालिका पदाधिकाºयांना मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यास सांगितल्याने सभागृह नेते दिनकर पाटील हे फडणवीस यांना भेटण्यास न जाताच परतले. महाजन यांना भेटण्यासाठी जाणाºया शिष्टमंडळात आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, विजय साने, लक्ष्मण सावजी या कोअर कमिटी सदस्यांनी जाणे टाळले त्यामुळे त्यांनी पालकमंत्र्यांना पत्र दिले असून, त्यात भाजपाचे तिन्ही आमदार आपसात वाद करतात, तसेच त्यांच्या वादामुळेच शहरातील करवाढ पूर्ण रद्द झालेली नाही. शेतकरी यामुळेच भरडला जाणार आहे. त्यामुळे आपला या प्रस्तावास विरोध आहे, तसेच आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री