शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
5
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
6
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
7
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
8
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
9
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
10
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
11
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
12
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
13
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
14
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
15
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
16
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
17
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
18
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
19
PHOTOS: तूफ़ान से लड़ने में मज़ा और ही कुछ है; अभिनेत्री नव्हं 'प्रसिद्ध' अधिकाऱ्याची भटकंती
20
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा

महापालिका : २७ कनिष्ठ, शाखा अभियंत्यांच्या बदल्या ‘नगररचना’त नव्या चेहऱ्यांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 1:22 AM

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वत:कडे असलेल्या नगररचना विभागाच्या सक्षमीकरणावर भर दिला.

ठळक मुद्देकामात दिरंगाई करणाºयांना दणका देण्यास सुरूवात महापालिकेच्या नगररचना विभागात गर्दी

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वत:कडे असलेल्या नगररचना विभागाच्या सक्षमीकरणावर भर दिला असून, या विभागात वर्षानुवर्षापासून ठाण मांडून बसलेल्या आणि कामात दिरंगाई करणाºयांना दणका देण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नगररचना विभागातील अभियंत्यांच्या बदल्या करून त्यांच्या जागेवर आपल्या कामकाजात प्रगती दाखविणाºया अभियंत्यांच्या नेमणुका केल्या आहेत. दरम्यान, गुरुवारी २२ अभियंत्यांच्या बदल्यांनंतर २७ कनिष्ठ आणि शाखा अभियंत्यांच्याही बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.सध्या शासनाच्या अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाच्या धोरणानुसार, कंपाउंडिंगचे प्रस्ताव सादर करण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागात गर्दी होत आहे. याशिवाय, आॅटो डिसीआरप्रणालीनुसार काम सुरू झालेले आहे. नगररचना विभाग हा आयुक्तांकडे असून, या विभागात साफसफाई करण्यासाठी आता बदल्यांचे सत्र सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार, गुरुवारी कार्यकारी अभियंत्यांसह काही उपअभियंत्यांच्याही बदल्या करण्यात आल्या.काही अभियंत्यांकडे देण्यात आलेली जबाबदारी वेगळी आणि प्रत्यक्ष काम वेगळे, अशी स्थिती आढळून आल्याने आयुक्तांनी भाकरी फिरविण्याचा निर्णय घेतला. आयुक्तांनी गेल्या तीन-साडेतीन महिन्यांत केलेल्या अवलोकनावरून कार्यक्षम आणि कामकाजात प्रगती दाखविणाºया अभियंत्यांना नगररचना विभागात संधी दिली असून, त्यात अनेक नव्या चेहºयांचा समावेश आहे. यापूर्वी नगररचना विभागात बदली करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ‘अर्थकारण’ चालायचे परंतु, कुठलेही प्रयत्न न करता नगररचना विभागात पदस्थापना झाल्याने अनेक अभियंत्यांना हर्षवायू झाला आहे. दरम्यान, महापालिकेतील २७ सहाय्यक, कनिष्ठ व शाखा अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात संजय गावीत (बांधकाम, सातपूर) नरेंद्र शिंदे (पाणीपुरवठा, सातपूर) संजय मोडक (घरपट्टी, मुख्यालय) जितेंद्रसिंह चव्हाण (पाणीपुुरवठा, सिडको), सुशील शिंदे (पाणीपुरवठा, नाशिक पूर्व), गोकुळदास मिरगणे (पाणीपुरवठा, पंचवटी), जे. एच. हांडगे (घरपट्टी, मुख्यालय), डी. आर. हांडोरे (नगररचना, मुख्यालय), नंदकुमार शिरसाठ (बांधकाम, नाशिकरोड), संजय खुळे (पाणीपुरवठा, सातपूर), सुरेश पाटील (मलनि:स्सारण, नाशिकरोड), एच. के.पठे (नगररचना, मुख्यालय), संतोष जोपळे (मलनि:स्सारण, पश्चिम), रुपेंद्रकुमार चव्हाण (पाणीपुरवठा, पंचवटी), एच. टी. नांदुर्डीकर (नगररचना, मुख्यालय), विशाल गरुड (नगररचना, मुख्यालय), रविंद्र पाटील (पाणीपुरवठा, नाशिक पूर्व), नवनीत भामरे (बांधकाम, पश्चिम), जयवंत राऊत (नगररचना, मुख्यालय), गोकुळ पगारे (मलनि:स्सारण, पंचवटी), दत्तात्रेय शिंगाडे (मलनि:स्सारण, सिडको), आर. बी. सोनवणे (घरपट्टी, मुख्यालय), आर. आर. ठाकूर (घरपट्टी, मुख्यालय), दिनेश सोनार (बांधकाम, पंचवटी), एस. पी. पाटील (नगररचना, मुख्यालय), सुभाष अहेर (पाणीपुरवठा, नाशिकरोड) आणि उदय जाधव (पाणीपुरवठा,सिडको) यांची बदली करण्यात आली आहे.