शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई, पुण्याला पसंती : दिवसभरात केवळ शंभर विद्यार्थ्यांची नोंद‘

By admin | Updated: July 31, 2014 00:55 IST

एमबीए’च्या समुपदेशनाकडे पाठ

नाशिक : पदवी शिक्षणानंतर प्रथम वर्ष एमबीए, एमएमएस यांसह अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी आज घेण्यात आलेल्या समुपदेशन फेरीकडे (कौन्सिलिंग राउंड) विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्यामुळे दिवसअखेर केवळ शंभर विद्यार्थ्यांचीच नोंद झाली आहे. राज्यातील सहा केंद्रांपैकी नाशिक येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च येथे विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी समुपदेशन फेरी घेण्यात आली. मात्र दिवसभरात केवळ १०० विद्यार्थ्यांनीच नोंदणी केली. त्यातील १६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यास नकार दिला, तर १३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. मात्र या १३ विद्यार्थ्यांपैकी बहुतेक विद्यार्थ्यांनी मुंबई येथील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केल्याने नाशिकमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. नाशिकमध्ये एमबीए अभ्यासक्र माची सुविधा पंधरा महाविद्यालयांमध्ये असून, जवळपास दीड हजार जागा आहेत. त्यासाठी गेल्या दोन वर्षांपर्यंत जवळपास साडेतीन ते चार हजार विद्यार्थ्यांचे अर्ज येत होते. परंतु एमबीएमधील करिअरच्या संधीचा विचार करता विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवत असल्याने निम्म्या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिकसह नागपूर, अमरावती, औरंगाबाद, पुणे, मुंबई या सहा केंद्रांमध्ये दहा हजार पाचशे पात्र उमेदवारांसाठी उद्या (दि. ३१) समुपदेशन फेरी घेण्यात येणार आहे. राज्यात एमबीएकरिता एकूण २० हजार जागा असून, कॅप राउंडअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांची संख्या दहा हजार ५०० एवढी आहे. (प्रतिनिधी)