शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

मुंबई नाका परिसराला बकाल स्वरूप प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 11:02 PM

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने दोन वेळा कारवाई करूनसुद्धा मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखाली गजरा विक्रेत्यांचे अतिक्रमण ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

इंदिरानगर : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने दोन वेळा कारवाई करूनसुद्धा मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखाली गजरा विक्रेत्यांचे अतिक्रमण ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. गजरा विक्रेत्यांचा अनधिकृत डेरा केव्हा उठणार? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.  मुंबई नाका चौफुलीवर महामार्ग बसस्थानक, द्वारका सर्कल, भाभानगर आणि पाथर्डी फाट्याकडून असे रस्ते एकत्र येतात. त्यामुळे चौफुलीवर दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते. उड्डाणपुलाखाली गजरे विक्रे त्यांनी अतिक्र मण केले आहे. गजरे विकून हे उदरनिर्वाह करत असले तरी त्यांनी पुलाखालीच डेरा टाकला आहे. त्यांच्या तेथेच आंघोळ, स्वयंपाक, झोप आदी गोष्टी होत असल्याने पुलाखाली बकालपणा वाढला आहे. मुंबई नाका येथे आकर्षक असे वाहतूक बेट करण्यात आल्याने सौंदर्यात भर पडली आहे, तर दुसरीकडे गजरे विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे शहराचे सौंदर्य बिघडत आहे. महापालिकेच्या वतीने दोन वेळेस अतिक्र मण निर्मूलन मोहिमेने कारवाई करून सुद्धा त्यांची पाठ फिरताच परिस्थिती ‘जैसे थे’च होत आहे. त्यामुळे लहान-मोठे अपघातही दररोज घडत असून जीवितहानीची वाट बघत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. कायमस्वरूपी असेच बकाल स्वरूप प्राप्त राहणार आहे? का असा उपरोधिक प्रश्नही संतप्त नागरिकांनी केला आहे.दुर्घटनेची शक्यतागजरे विक्रेत्यांची लहान मुले महामार्गावरून पळत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यताही टाळता येत नाही. तसेच लहान मुले दुचाकी आणि चारचाकीच्या पाठीमागे पळत असल्याने अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTrafficवाहतूक कोंडी