मुंबई-आग्रा महामार्गावर कारमधून मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:26 IST2018-12-13T00:25:54+5:302018-12-13T00:26:18+5:30

मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगाव तालुक्यातील मुंगसे शिवारात मद्याची वाहतूक करणारी मारुती कार बुधवारी (दि़ १२) दुपारी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडली असून, कार व मद्यसाठा असा १ लाख १ हजार ९६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़

 At the Mumbai-Agra highway, the liquor seized from the car | मुंबई-आग्रा महामार्गावर कारमधून मद्यसाठा जप्त

मुंबई-आग्रा महामार्गावर कारमधून मद्यसाठा जप्त

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगाव तालुक्यातील मुंगसे शिवारात मद्याची वाहतूक करणारी मारुती कार बुधवारी (दि़ १२) दुपारी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडली असून, कार व मद्यसाठा असा १ लाख १ हजार ९६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़
मुंबई-आग्रा महामार्गावरून मद्याची चोरटी वाहतूक केली जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेस मिळाली होती़ त्यानुसार या परिसरात सापळा रचून मारुती कार (एमएच ०१, जीए १२२) पाठलाग करून पकडली़ या कारमध्ये प्रिन्स देशी दारूचे सहा तर टँगो देशी दारूचे दोन बॉक्स होते़ या प्रकरणी संशयित वाहनचालक देवीदास रावसाहेब नगरकर (३५, रा़ पिंपळवाडी रोड, शिर्डी, ता़ राहाता़, हल्ली राहणार उमराणे) यास अटक केली असून, त्याच्यावर मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी केली़

Web Title:  At the Mumbai-Agra highway, the liquor seized from the car