शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

मुहूर्त मकर संक्रांतीचा : नाशिकच्या रामकुंडावर स्नानासाठी उडाली झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 2:26 PM

या तिथीच्या दिवशी नदीमध्ये स्नान करण्याला शुभ मानले जाते. यामुळे भाविक मोठ्या श्रध्दने स्नान करण्यासाठी नदीवर जमले होते. यामुळे जणू कुंभमेळ्याची पर्वणी आहे, की काय असेच चित्र पहावयास मिळाले.

ठळक मुद्दे सकाळपासून भाविकांची नदीवर गर्दी बाहेरगावाहून आलेल्या पर्यटकांमुळे रामकुंडावरील वाहनतळ हाऊसफुल्ल गोदावरीवर स्नान करण्यासाठी महिला, पुरूषांची झुंबड

नाशिक : वर्षभरातील महत्त्वाच्या मुहूर्तांपैकी एक असलेला मकरसंक्रांतीचा मुहूर्त साधत बहुसंख्य नागरिकांनी गोदावरीच्या रामकुं डावर स्नानासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती.मकर संक्रांत हा नववर्षामधील पहिला सण असतो. या सणानिमित्त नदीपात्रावर स्नान करण्याची प्रथा आहे. या प्रथेनिमित्त शहरातील गोदावरीवर स्नान करण्यासाठी महिला, पुरूषांची झुंबड उडाली होती.सुर्याचा धनू राशीमधून मकर राशीत होणारा प्रवेशाची ही तिथी मानली जाते. या तिथीपासून सुर्य दक्षिणायनपासून उत्तरायण होत जातो.

या तिथीच्या दिवशी नदीमध्ये स्नान करण्याला शुभ मानले जाते. यामुळे भाविक मोठ्या श्रध्दने स्नान करण्यासाठी नदीवर जमले होते. यामुळे जणू कुंभमेळ्याची पर्वणी आहे, की काय असेच चित्र पहावयास मिळाले. सकाळपासून भाविकांची नदीवर गर्दी झाली होती. रामकुंड, गांधी तलाव, दुतोंड्या मारुती कुंडापर्यंत भाविक नदीकाठावर घाटावर बसून डुबकी लगावताना दिसून आले. शहरासह जिल्हाभरातून तसेच विविध राज्यांमधूनही धार्मिक पर्यटनासाठी नाशिकमध्ये आलेल्या भाविकांनी स्नानाचा आनंद लुटला. बाहेरगावाहून आलेल्या पर्यटकांमुळे रामकुंडावरील वाहनतळ हाऊसफुल्ल झाले होते. यावेळी लोटलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्याकडून वाढीव पोलीस बंदोबस्त रामकुंड परिसरात तैनात करण्यात आला होता.अनेकांनी गोदापात्रात उतरून आंघोळ करीत गोदावरीला नमस्कार करत पुजाविधी आटोपला.

टॅग्स :godavariगोदावरीNashikनाशिक