बॉक्सिंगमध्ये मुग्धा कुलकर्णीला रजतपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 05:38 PM2018-11-13T17:38:49+5:302018-11-13T17:39:04+5:30

सटाणा : येथील ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या किलबिल इंग्लिश मीडिअम स्कूलची विद्यार्थिनी मुग्धा सचिन कुलकर्णी हिने नुकत्याच मुंबई येथे झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेत रजतपदक पटकावले. मुग्धाने द्वितीय स्थान मिळविल्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेतील अंतिम फेरीत ती दाखल झाली आहे.

 Mugdha Kulkarni silver medal in boxing | बॉक्सिंगमध्ये मुग्धा कुलकर्णीला रजतपदक

सटाणा येथील किलबिल स्कूलची विद्यार्थिनी मुग्धा कुलकर्णीचा सन्मान करताना प्राचार्य संगीता शुक्ल. समवेत धनंजय शुक्ल , मुकेश नय्या, सतीश चिंधडे, मनोज सोनवणे आदी.  

Next
ठळक मुद्देमुंबई येथे झालेल्या बॉक्सिंगच्या १७ वर्ष व ७० किलो मुलींच्या गटात राज्यस्तरीय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दुसरा क्र मांक पटकावल्यामुळे ती अंतिम फेरीत दाखल झाली आहे.

सटाणा : येथील ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या किलबिल इंग्लिश मीडिअम स्कूलची विद्यार्थिनी मुग्धा सचिन कुलकर्णी हिने नुकत्याच मुंबई येथे झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेत रजतपदक पटकावले. मुग्धाने द्वितीय स्थान मिळविल्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेतील अंतिम फेरीत ती दाखल झाली आहे.
ही स्पर्धा पुणे येथील राज्य क्र ीडा युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्र ीडा अधिकारी मुंबई शहर व महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटनेतर्फेघेण्यात आल्या आहेत. या यशामुळे मुग्धा कुलकर्णी, प्रशिक्षक मुकेश नय्या यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य संगीता शुक्ल, संस्थेचे अध्यक्ष धनंजय शुक्ल, सचिन कुलकर्णी, सिद्धेश शुक्ल, सतीश चिंधडे, मनोज सोनवणे, नितीन चंद्रात्रे उपस्थित होते.
 
Web Title:  Mugdha Kulkarni silver medal in boxing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.