श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 13:16 IST2019-03-05T13:15:47+5:302019-03-05T13:16:08+5:30

दिंडोरी : थोर समाजसुधारक महाराष्ट्र भूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे लोकार्पण आंबेगाव (दिंडोरी) ग्रामपंचायत कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Mr. Renewal of the image of Nanasaheb Dharmadhikari | श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे लोकार्पण

श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे लोकार्पण

दिंडोरी : थोर समाजसुधारक महाराष्ट्र भूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे लोकार्पण आंबेगाव (दिंडोरी) ग्रामपंचायत कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
एक सुदृढ व सशक्त भारताचे नागरिक घडण्याचे कार्य महाराष्ट्र भूषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांनी निरूपणाच्या माध्यमातून समाजप्रबोधनचे कार्य सुरू केले. अत्यंत मेहनतीने ,हिमतीने समाज व त्यातील मनुष्य चांगल्या विचारात उभा राहावं म्हणून आपले आयुष्य परोपकारासाठी वेचले गेले. त्यांच्या नंतर हा वारसा नानासाहेबांची प्रेरणा घेत पद्मश्री डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सुरु ठेवले आहे. नानासाहेब धर्माधिकारी यांची प्रतिमा अनावरण करण्याचा मान मिळाल्याचे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, सरपंच अलका वाघ, कल्पना गणोरे, कैलास गणोरे, बाबूशेठ बागमार, रविंद्र महाजन, दिलीप वाघ, मधुकर पिंगळ, तुकाराम जोंधळे, सागर गायकवाड, बी के पाटील, चंद्रकांत वाघ यांचेसह प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. 

Web Title: Mr. Renewal of the image of Nanasaheb Dharmadhikari

टॅग्स :Nashikनाशिक