सिन्नरचे महेंद्र पंडित यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 18:01 IST2019-04-26T17:57:00+5:302019-04-26T18:01:01+5:30
सिन्नर : नक्षलवाद्यांविरुध्द केलेल्या कारवाईत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सिन्नरचे भूमिपूत्र आणि गडचिरोलीचे अपर पोलीस अधीक्षक महेंद्र कमलाकर पंडित यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.

सिन्नरचे महेंद्र पंडित यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह
१ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पोलीस मुख्यालयाच्या संचलन मैदानावर आयोजित करण्यात येणाऱ्या संचलनावेळी त्यांचा गौरव केला जाणार आहे. खडतर परिश्रम करत लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होत २०१३ साली महेंद्र पंडित आयपीएस झाले. त्यानंतर भारतीय पोलिस सेवेत पोलीस अधीक्षकपदाचे प्रशिक्षण घेतले. नांदेड येथे दोन वर्षाच्या काळात पोलीस उपअधीक्षकपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. २०१७ पासून ते नक्षलग्रस्त गडचिरोली येथील अपर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. दोन वर्षात त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत उल्लेखनीय कामगिरी बजावल्याने पोलीस दलाने त्याची दखल घेतली. त्यांना ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह २०१८’ जाहीर झाले आहे. भूमिपुत्राच्या या चमकदार कामिगरीने सिन्नरकरांची मानही अभिमानाने उंचावली आहे.