ज्यांना खोक्यांची सवय त्यांना...; खासदार श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टेाला

By संजय पाठक | Updated: April 2, 2023 17:07 IST2023-04-02T17:07:00+5:302023-04-02T17:07:39+5:30

सध्या रोजच एकच भाषण ऐकायला मिळत आहे. त्यातील शब्द एकच आहे, खाेके आणि खंजीर.

MP Shrikant Shinde's Target to Uddhav Thackeray | ज्यांना खोक्यांची सवय त्यांना...; खासदार श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टेाला

ज्यांना खोक्यांची सवय त्यांना...; खासदार श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टेाला

नाशिक- ज्यांना खोक्यांची सवय आहे. त्यांना सगळीकडे खोकेच दिसत आहेत. रात्री झोपल्यानंतरही ते खंजीर आणि खोकेच बोलसत असतील. त्यांची एकदा नार्को टेस्ट करा, म्हणजे कोणाकडे किती खोके आहे, ते समजेल अशा शब्दात शिवसेनेचे (शिंदे गट) नेते खासदार श्रीकांत शिंंदे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

नाशिकमध्ये शिंदे गटाच्या भव्य कार्यालयाचे उदघाटन आज दुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अडीच वर्षे कसे काम सुरू हेाते, हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे.  आमदार आणि मंत्र्यांना भेटायला मुख्यमंत्र्यांना वेळ नव्हता.
गेल्या अडीच वर्षात कशाप्रकारे काम सुरू आहे. हे आपल्याला माहिती आहे. असे सांगून खासदार शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना टोमणाही मारला. सध्या रोजच एकच भाषण ऐकायला मिळत आहे. त्यातील शब्द एकच आहे, खाेके आणि खंजीर. ज्यांना खोक्याची सवय आहे, त्यांना सर्व खोकेच दिसत आहेत. या आधी इतिहासात घडले नाही इतके आमदार खासदार शिवसेना सोडून गेले त्याचे आधी
आत्मपरीक्षण करा, असा सल्लाही श्रीकांत शिंदे यांनी दिला.

Web Title: MP Shrikant Shinde's Target to Uddhav Thackeray