वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 07:41 PM2020-09-26T19:41:54+5:302020-09-26T19:43:47+5:30

दिंडोरी : महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने राज्यातील सर्व विद्यापीठातील तसेच महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी गुरूवारी (दि. २४) पासुन राज्यस्तरीय लेखणी बंद व अवजार बंद आंदोलन सुरू केले आहे.

Movement to stop the writing of senior college non-teaching staff | वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या आंदोलनात सहभागी झालेले व्ही.एन.नाईक महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी.

googlenewsNext
ठळक मुद्देसर्व सदस्य यांनी महासंघाने पुकारलेल्या आंदोलनात सहभाग घेतला

दिंडोरी : महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीनशिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने राज्यातील सर्व विद्यापीठातील तसेच महाविद्यालयातीलशिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी गुरूवारी (दि. २४) पासुन राज्यस्तरीय लेखणी बंद व अवजार बंद आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनात नाशिक विभागातील क्र ांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नाशिक व दिंडोरी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या स्थानिक शाखेतील पदाधिकारी व सर्व सदस्य यांनी महासंघाने पुकारलेल्या आंदोलनात सहभाग घेतला आहे.
शिक्षकेतर कर्मचारी वर्गातील ७० टक्के कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग यांना लागु न होणे, सेवाअंतर्गत आश्वासीत प्रगती योजनेचे फायदे पूर्वीप्रमाणेच पुन्हा पुर्वलक्षी प्रभावाने लागु करणे, सातवा वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरीत लागु करणे आदी मागन्यांसाठी राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ व विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने हे लेखणी व अवजार बंद आंदोलन करण्यात आलेले आहेत.
यामध्ये महाराष्टÑ राज्यातील सर्व विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला आहे. नाशिक शहर व नाशिक ग्रामिण मधील विविध महाविद्यालयातील सुमारे ४५०० अनुदानित शिक्षकेतर कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. व्ही. एन. नाईक महाविद्यालयातील आंदोलनात स्थानिक शाखचे विवेक गामणे, राजेंद्र तिवडे, प्रदिप दरगोडे, सोमनाथ धात्रक, ज्ञानेश्वर सांगळे, रावसाहेब आव्हाड आदी सदस्य सहभागी झाले होते. 

 

Web Title: Movement to stop the writing of senior college non-teaching staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.