महावितरण कंपनी कार्यालयाबाहेर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 19:25 IST2021-02-22T19:22:14+5:302021-02-22T19:25:59+5:30
लासलगाव : महावितरणच्या इलेक्ट्रीक पोलवर वाहन आदळल्याने खांब अतिशय जुनाट झाल्याने खशंब वाकून खाली पडला. सुदैवाने दुर्घटना टळली मात्र यासंदर्भात ग्रमस्थांनी प्रसंगावधान राखत वीज वितरण मंपनीच्या कायार्लयात धाव घेतली मात्र तेथे कोणीच नसल्याने संतप्त नागरीकांनी महािवतरणच्या कायार्लयासमोर अधिकारी येई पर्यंत आंदोलन केले.

अपघातामुळे लाईट गेलेल्या कोटमगावरोड येथील महालक्ष्मी नगर, कृषी नगर, श्रीराम नगर, बालाजी नगर, दत्तनगर या भागातील नागरिकांनी महावितरण कंपनीच्या कायार्लयासमोर आंदोलन केले.
लासलगाव : महावितरणच्या इलेक्ट्रीक पोलवर वाहन आदळल्याने खांब अतिशय जुनाट झाल्याने खशंब वाकून खाली पडला. सुदैवाने दुर्घटना टळली मात्र यासंदर्भात ग्रमस्थांनी प्रसंगावधान राखत वीज वितरण मंपनीच्या कायार्लयात धाव घेतली मात्र तेथे कोणीच नसल्याने संतप्त नागरीकांनी महािवतरणच्या कायार्लयासमोर अधिकारी येई पर्यंत आंदोलन केले.
कोटमगाव रस्त्यावर रविवारी (दि.२१) रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४०७ गाडी (एम एच १५ सीके ७५६) ही महावितरण कंपनीच्या पोलवर रात्री साडे अकरा दरम्यान जाऊन आदळली त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. परंतु पोल हे सर्व जुने असल्यामुळे गाडीच्या धक्क्याने पोल खाली पडल्याने सर्व ओव्हरहेड वायर गाडीच्या टपावर पडली./
योगायोगाने आजूबाजूस रात्री कोणत्याही प्रकारची वर्दळ नसताना हा प्रकार घडला, परंतु रात्री शिवसेनेचे निफाड तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी महावितरण कंपनीच्या वायरमन यांना फोन करून वायर कट केली. त्यामुळे पुढील दूर्घटना टळली. परंतु गाडीने धडक दिलेले पोलचे काम सकाळी अकरा वाजेपर्यंत कोणत्याही वायरमनने सुरु केले नव्हते.
लासलगाव येथील ज्येष्ट नागरिक यांनी हा सर्व प्रकार महावितरण कंपनीच्या ऑफिस येथे जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला असता तेथे कोणतेही अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे सर्वांनी अधिकारी येत नाही तो पर्यंत तेथेच ठिय्या मांडला. लासलगाव, चांदवड, नाशिक येथील सर्व अधिकारी बैठकीत तीन-तीन तास व्यस्त होते. त्यामुळे शिवसेना तालुकाप्रमुख पाटील यांनी अखेर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे स्वीय सहाय्यक खरात यांना फोन केल्याने पुढील महावितरण कंपनीची यंत्रणा सुरळीत प्रमाणे कामाला लागली. सामान्य नागरिकांची दखल लासलगाव येथील महावितरण कंपनीने लवकर न घेतल्यामुळे लासलगाव येथील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
यवेळी अक्षय ब्राम्हेचा, मोहन आव्हाड, तुषार देवरे, नितीन मापारी, जितेंद्र दगडे, भरत दगडे, सचिन दगडे, सुरेश कुमावत, व्यंकटेश, शरद काळे, नितीन मापारी, योगेश डुकरे, दिपक परदेशी, मयूर दगडे, सुरेश कुमावत, भैय्या वाघ, नाना सूर्यवंशी, विकास जगताप, तुषार देवरे, समीर माठा, लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक सचिन शिंदे, भूषण लोढा, चिराग जोशी, भैया नाईक आदी उपस्थित होते.