शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
3
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
4
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
5
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
6
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
7
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
8
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
9
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
10
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
11
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
12
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
13
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
14
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
15
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
16
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
17
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
18
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
19
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
20
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

एचएएल कामगारांचे आंदोलन तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 5:37 PM

ओझर: हिंदुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेडच्या कामगार वर्गाचा वेतनकरार जवळपास ३०महिन्यांपासून प्रलंबित आहे.

ओझर: हिंदुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेडच्या कामगार वर्गाचा वेतनकरार जवळपास ३०महिन्यांपासून प्रलंबित आहे.आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आॅल इंडिया को-आॅर्डिनेशन कमिटीने दि.२५ जून पासून देश पातळीवर साखळी उपोषण सुरु केले आहे.नाशिक येथील संघटनाही को-आॅर्डिनेशन कमिटीच्या सोबत ठामपणे आंदोलन करत आहे. केवळ व्यवस्थापनाचे आडमुठे धोरण या चिघळलेल्या परिस्थितिस कारणीभुत असल्याचा आरोप कामगार संघटनेने केला आहे.अधिकारी वर्गाच्या तुलनेत सापत्न वागणूक देत तुटपूंजी वाढ देत असल्याने देशभरातील वीस हजार कामगार वर्गात व्यवस्थापनाविरोधात तीव्र असंतोष पसरला आहे.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने कारखान्याच्या मुख्य प्रवेश द्वारावर शुक्र वारी सकाळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली .एक जानेवारी २०१७ च्या वाढीव वेतन कराराचे लाभअधिकारी वर्गाला मिळत असून आस्थापनाचे आधारस्तंभ असलेल्या कामगारांची मात्र व्यवस्थापन चेष्टा करत आहे.निष्पक्ष आणि रास्त आणि विनाविलंब वेतन करार ही सर्व भारतातील संघटनांची रास्त मागणी आहे.कामगार वर्ग हा कुठल्याही आस्थापनेचा मूळ पाया असतो त्याचीच गळचेपी करण्याचा प्रकार व्यवस्थापन करत असल्याची भावना आहे. केवळ एचएएल कामगारांचे वेतनमान न वाढल्याने कामगार वर्गात असंतोष पसरत आहे. त्याचा उद्रेक होण्यापर्यन्त परिस्थिती चिघळवू पाहत आहे.आस्थापनेची आर्थिक स्तिथि चांगली असून अधिकारी वर्गास भरघोस वाढ देणारे व्यवस्थापन कामगार वर्गाला अतिशय तूटपूंजी वाढ देवून सापत्न वागणूक देत आहे.देशभरातील सर्व प्रभागांमध्ये याचा निषेध म्हणून साखळी उपोषण आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

टॅग्स :Strikeसंप