मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 01:19 IST2020-08-29T23:47:45+5:302020-08-30T01:19:22+5:30

सटाणा : बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथील किल्ल्याच्या पायथ्याशी श्री उद्धव महाराजांच्या मंदिरासमोर तसेच श्रीपुरवडे येथील भीमाशंकर मंदिरासमोर बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन छेडण्यात आले.

Movement at the foot of Mulher Fort | मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी आंदोलन

मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी घंटानाद आंदोलनात सहभागी आमदार दिलीप बोरसे, रवींद्र गांगुर्डे, अभिमन ठाकरे, दत्ता तिवारी, विनोद शिंदे, आशाबाई जगताप, सुभाष येवले, सागर अहिरे, गौरव परदेशी आदी.

ठळक मुद्देमहाराष्ट्रातही सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करावीत, अशी मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथील किल्ल्याच्या पायथ्याशी श्री उद्धव महाराजांच्या मंदिरासमोर तसेच श्रीपुरवडे येथील भीमाशंकर मंदिरासमोर बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी ‘दार उघड उद्धवा, दार उघड’ अशा घोषणा देत परिसरर दणाणून सोडला. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करावीत, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली.
आंदोलनात भाजप तालुका उपाध्यक्ष रवींद्र गांगुर्डे, पंचायत समितीचे माजी सदस्य अभिमन ठाकरे, दत्ता तिवारी, विनोद शिंदे, आशाबाई जगताप, सुभाष येवले, सागर अहिरे, गौरव परदेशी, अनिल सत्पर्षी, सुनील चव्हाण, श्रीपुरवडे येथील रामदास पवार, सुदाम पवार, सचिन हिरे, बाबुलाल पवार, छोटू कुंवर, संजय शिम्परे, संतोष पवार, देवीदास ठाकरे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Movement at the foot of Mulher Fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.