कंत्राटी आरोग्य सेवकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 14:36 IST2020-06-22T14:36:42+5:302020-06-22T14:36:49+5:30

ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी आरोग्य सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ अहिरराव यांना लेखी निवेदन दिले.

The movement of contract health workers | कंत्राटी आरोग्य सेवकांचे आंदोलन

कंत्राटी आरोग्य सेवकांचे आंदोलन

ब्राह्मणगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी आरोग्य सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ अहिरराव यांना लेखी निवेदन दिले.  कंत्राटी आरोग्य सेविका यांची नियमित आरोग्य सेवेत समायोजनाकरिता गेल्या १५ वर्षापासून मागणी करत आहेत. वेळोवेळी आंदोलने करूनही शासनाने दखल घेतली नाही. कोरोणा काळातही या कंत्राटी आरोग्य कर्मचार्यांनी सेवा दिली मात्र शासन दखल घेत नसल्याने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या प्रसंगी किरण शेवाळे,पंकज मोहांकर,राहुल पवार,मनाली हिरे,रु पाली वाघ,सोनाली वाघ,माधुरी आहेर,क्षमा शिर्शेट्टी, वैशाली शिरोळे आदी उपस्थित होते.

Web Title: The movement of contract health workers

टॅग्स :Nashikनाशिक