सीटूच्या वतीने सरकारच्या विरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 00:19 IST2020-04-22T21:30:18+5:302020-04-23T00:19:09+5:30
सातपूर : कोरोनाचे संकट हाताळताना केंद्र सरकारने निष्क्रि यता, उदासीनतेचे धोरण स्वीकारल्याने मंगळवारी सीटू कामगार संघटनेने राज्यभर निषेध दिन पाळला.

सीटूच्या वतीने सरकारच्या विरोधात आंदोलन
सातपूर : कोरोनाचे संकट हाताळताना केंद्र सरकारने निष्क्रि यता, उदासीनतेचे धोरण स्वीकारल्याने मंगळवारी सीटू कामगार संघटनेने राज्यभर निषेध दिन पाळला. संचारबंदी लागू असल्याने घरी असलेल्या कामगारांनी घरासमोर तर कामावर असलेल्या कामगारांनी प्रवेशद्वारासमोर मागण्यांचे फलक हातात घेऊन केंद्र सरकारचा निषेध केला. संचारबंदी असूनही आंदोलनात पन्नास हजार कामगार सहभागी झाल्याचा दावा केला आहे.
पंतप्रधानांनी लॉकडाउन लागू केले आहे. पुरेसा वेळ न देता नोटबंदीच्या निर्णयाप्रमाणे हा निर्णय कुठलीही पूर्वतयारी न करता घेण्यात आला. त्यामुळे नागरिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कोरोना विरु द्धचा संघर्ष करणाऱ्या राज्य सरकारांना केंद्र सरकारने फारशी आर्थिक मदतही केलेली नाही. राज्य सरकारे या विषाणूचा अपुºया साधनानिशी प्रतिकार करीत आहेत. केंद्र सरकार आणि पंतप्रधानांच्या या धोरणाचा, निष्क्रि यतेचा आणि उदासीनतेचा सीटू कामगार संघटनेने मंगळवारी (दि. २१) राज्यात निषेध दिन पाळला.