नाशिकच्या गंगापूरवर शोककळा! कार-कंटेनर अपघातात पाच तरुणांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 21:42 IST2023-11-26T21:42:46+5:302023-11-26T21:42:59+5:30
अंकाईयेथील रेल्वे उड्डाणपुलावर हा अपघात झाला. सर्व तरुण हे नाशिकच्या गंगापूरमधील होते.

नाशिकच्या गंगापूरवर शोककळा! कार-कंटेनर अपघातात पाच तरुणांचा जागीच मृत्यू
मनमाड-येवला राज्य महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कार आणि ट्रकमध्ये झालेली ही टक्कर एवढी भीषण होती की स्विफ्ट कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला होता.
अंकाईयेथील रेल्वे उड्डाणपुलावर हा अपघात झाला. सर्व तरुण हे नाशिकच्या गंगापूरमधील होते. धार्मिक कार्यक्रमाला जातो असे सांगून ते बाहेर पडले होते. पोलिसांनी त्यांचे मृतदेह विच्छेदनासाठी मनमाड उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.
रोहित धनवटे, श्रेयस धनवटे, ललित सोनवणे, गणेश सोनवणे, प्रतीक नाईक अशी मृतांची नावे आहेत. अपघात झाला तेव्हा या भागात अवकाळी पाऊस सुरु होता. यामुळे मदत कार्यातही अडथळे येत होते. महामार्गावर सुमारे तासभर वाहतूक कोंडी झाली होती. क्रेनने दोन्ही गाड्या बाजुला करण्यात आल्या.