मेसनखेडे शिवारात अपघातात मोटारसायकलस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 17:43 IST2019-01-30T17:42:59+5:302019-01-30T17:43:37+5:30
चांदवड तालुक्यातील मनमाड रोडवर मेसनखेडे शिवारात दत्ताचे शिंगवे फाट्याजवळ मालट्रकने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. मंगळवारी सायंकाळी हा अपघात घडला.

मेसनखेडे शिवारात अपघातात मोटारसायकलस्वार ठार
चांदवडकडून मनमाडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टी.एन ५२ जे ३५१५ या मालट्रकने मनमाडकडून चांदवडकडे येणाºया एम.एच.१५,सी.वाय. ५०१७ या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार सखाहरी देवमन पवार (४४ रा. उसवाड ता. चांदवड) हे जागीच ठार झाले. याबाबतची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र जगताप, हवालदार नरेंद्र सौंदाणे हे घटनास्थळी गेले त्यांनी पंचनामा करुन मृतदेहास चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. ट्रकचालक पुरुषोत्तम एस. श्रीनिवासन नायडू (रा. तामीलनाडू) यास ताब्यात घेतले आहे. याबाबत संजय पवार यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरुन अपघाताचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास नरेंद्र सौंदाणे करीत आहेत.