मोटारसायकल चोरास पाच महिने कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 17:43 IST2020-01-18T17:43:20+5:302020-01-18T17:43:48+5:30
जिल्ह्यातील चोरीच्या तब्बल १६ मोटार सायकल जप्त

मोटारसायकल चोरास पाच महिने कारावास
लासलगाव : मोटारसायकल चोरणारा संशयित आरोपी मनोहर ब्राह्मणे यास निफाड येथील वरीष्ठ स्तर न्यायालयाच्या न्यायाधिश श्रीमती मृदुला एस.कोचर यांनी पाच महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निफाड तालुक्यातील पिंप्री येथील दत्तात्रेय नणे यांची मोटारसायकल (बजाज सी टी) त्यांच्या राहत्या घरासमोरून दि ७ जुन २०१९ रोजी चोरी गेली होती. त्यामुळे त्यांनी निफाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर चोरी प्रकरणी पोलिसांनी तपास करत संशयित आरोपी मनोहर ब्राह्मणे (रा.गणोरवाडी ता.दिंडोरी) यास अटक करून वाहन जप्त केले होते. त्यासंदर्भात दोषारोपपत्र निफाड न्यायालयात दाखल करण्यात आला होते. सदर खटल्याचे कामकाज मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती मृदुला कोचर यांच्या न्यायालयात चालले. सरकारी अभियोक्ता म्हणून राजीव एम .तडवी यांनी कामकाज केले. आरोपी याने त्याच्या घराच्या पाठीमागे चोरीचे वाहन लपवुन ठेवले होते. आरोपी कडून नाशिक जिल्ह्यातील चोरीच्या तब्बल १६ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या होत्या. सदर गुन्ह्यात पोलीस हवालदार पी. एस. कोकाटे गुन्हे शाखा युनिट १, नाशिक शहर यांची महत्वपूर्ण साक्ष नोंदवण्यात आली होती.