३०० फुट दरीत कोसळून मोटारसायकलस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 13:27 IST2018-09-18T13:24:38+5:302018-09-18T13:27:11+5:30
तळवाडे दिगर : बागलाण तालुक्यातील मोरकुरे-तळवाडे दिगर रस्त्यावर हत्ती नदीच्या सुमारे ३०० फुट खोल दरीत मोटरसायकल कोसळून झालेल्या अपघातात एक शेतमजूर ठार झाला असून दुसरा जखमी झाला आहे.

३०० फुट दरीत कोसळून मोटारसायकलस्वार ठार
तळवाडे दिगर : बागलाण तालुक्यातील मोरकुरे-तळवाडे दिगर रस्त्यावर हत्ती नदीच्या सुमारे ३०० फुट खोल दरीत मोटरसायकल कोसळून झालेल्या अपघातात एक शेतमजूर ठार झाला असून दुसरा जखमी झाला आहे.
बागलाणच्या पश्चिम भागातील तळवाडे दिगर गावास मोरकुरे गावाजवळून जोडनारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्याच्या बाजूला हत्ती नदी असून नदीच्या उजव्या बाजूने हा रस्ताजेथुन तळवाडे गावास जोडला जातो त्या बाजूला सुमारे ३०० फुट खोल दरी आहे. रस्त्याच्या अंदाज न आल्याने मोटारसायकल क्र (एमएच १५-३३८६) दरीत गेल्याने या भागात द्राक्ष छाटनीसाठी आलेले शेतमजुर देवीदास धोंडीराम धाणे (६५) रा धोंड गव्हाणवाडी (चांदवड) यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा सहकारी प्रकश दामु कडाळे (५५) हे जबर जखमी झाले आहेत . सटाणा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातातील वाहनधारकास तिव्र वळणाचा अंदाज न आल्याने ही दुचाकी थेट नदीपात्राच्या बाजूला दाट झाडीत सुमारे खोल दरित गेल्याने हा अपघात झाला.
-----------------------------------
सदर रस्ता हा धोकेदायक असल्याने स्थानिक जनतेने अनेक वेळा या रस्त्याला संरक्षण भिंत बांधण्याची वेळोवेळी मागणी केली मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यानेच अपघातांना निमंत्रण मिळत आहे. या रस्त्यामुळे कळवण आगाराने सुरु केलेली कळवण तळवाडे ही बस सुरक्षिततेतेच्या दृष्टीने बंद केली असून हा रस्ता पठावे, मोरकुरे, चिंचपाडा, सावरपाडा परिसरातील जनतेचा वापराचा मुख्य रस्ता असून येथे भविष्यात मोठा अपघात होउ नये या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने संरक्षण भिंत उभारावी अशी मागणी तळवाडे दिगरचे रहिवाशी व सटाना बाजार समितिचे संचालक पंकज ठाकरे, मोरकुरेचे सरपंच काळू ढुमसे, भिलदरचे शिवदास अहिरे यांनी केली आहे.