समांतर रस्त्यावरुन जाणाऱ्या मोटारीने घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 14:35 IST2018-07-16T14:34:11+5:302018-07-16T14:35:35+5:30

समांतर रस्त्यावरुन जाणाऱ्या मोटारीने घेतला पेट
नाशिक : मुंबईनाक्यावरुन इंदिरानगरक डे जाणा-या एका मोटारीने मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे पेट घेतला. मोटारचालकाने प्रसंगावधान राखून तातडीने वाहन थांबविले आणि मोटारीतून सुरक्षितरित्या बाहेर आला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुख्यालय येथील अग्निशामक दलाचे जवान बंबासह घटनास्थळी पोहचले. लिडिंग फायरमन इकबाल शेख, शिवाजी फूगट, नाना गांगुर्डे, शिवाजी खुळगे, दिनेश लासुरे बंबचालक जी.व्ही.निंबेकर आदिंनी घटनास्थळी धाव घेत आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली मोटार तातडीने पाण्याचा मारा करुन विझविली. मोटार नाशिकवरुन मुंबईकडे जात होती; मात्र अचानकपणे इंजिनमध्ये बिघाड होऊन समोरील बाजूने धूर निघू लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने तत्काळ मोटार रस्त्याच्याकडेला उभी करुन अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. सुदैवाने मोटारीत चालकाव्यतिरिक्त अन्य प्रवाशी नव्हते अन्यथा अनर्थ झाला असता.