शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टाच्या दारातच सासू-सून भिडली, मग सगळेच पडले तुटून! तुंबळ हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 16:06 IST

नाशिकमध्ये सासू- सुनेचा वाद विकोपाला गेल्यानंतर न्यायालय प्रवेशद्वारावरच दोन गटांमध्ये 'फ्री स्टाईल' हाणामारी झाल्याचे पाहायला मिळालं

Nashik Viral Video: सासू आणि सूनेमध्ये चांगले संबंध आहेत असं फार क्वचितच पाहायला मिळतं. अनेकदा त्यांच्यात वाद होताना पाहायला मिळतात. पण सासू सुनेमध्ये हाणामारी झाल्याचे प्रकरण नाशकातून समोर आलं आहे. नाशिकच्या जिल्हा न्यायालयाच्या बाहेर दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्यायालयाच्या गेटवर कौटुंबिक वादतून सासू-सून आणि कुटुंबीयांमध्ये जोरदार हाणामारी आणि बाचाबाची झाली. सुरुवातीला महिलांमध्ये सुरु असलेल्या हाणामारीमध्ये कुटुंबातील पुरुषही सामील झाले आणि वाद वाढल्याचे पाहायला मिळालं.

न्यायालयीन सुनावणीसाठी तारखेला समोरासमोर आलेल्या सासू आणि सून यांच्यात झालेल्या हिंसक भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुरुवारी नाशिकच्या जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या भांडणाने तिथल्या लोकांना धक्का बसला होता. घरगुती वादातून झालेल्या सासू सुनेच्या मारामारीत  पुरुषांसह महिलादेखील एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळते. 

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच सुनावणीसाठी आले असताना सासू यमूना यशवंत निकम आणि सुनेचा भाऊ दीपक हिरामण साळवे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी या भांडणात उडी घेतली आणि हाणामारी सुरु केली. यावेळी महिला केस ओढत एकमेकांना मारत होत्या तर पुरुष मंडळी हातांनी, पायांनी मारहाण करत होते. लोकांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं.

शेवटी सरकारवाडा पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि दोन्ही गटांना पोलीस ठाण्यात नेले. यादरम्यानही दोन्ही गटाचे लोक एकमेकांना शिवीगाळ करत होते. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर अशी फ्रीस्टाइल मारामारी झाल्याने, ही घटना दिवसभर न्यायालयाच्या आवारात चर्चेचा विषय बनली होती.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालयPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी