गोदानगर शाळेत मातृ-पितृ दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:43 IST2018-02-10T23:47:49+5:302018-02-11T00:43:18+5:30
सायखेडा : येथील गोदानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी मातृ-पितृ दिन साजरा केला.

गोदानगर शाळेत मातृ-पितृ दिन
सायखेडा : येथील गोदानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी मातृ-पितृ दिन साजरा केला. मुख्याध्यापक राजेंद्र जाधव यांनी शाळेतील मुलांच्या सर्व आईवडिलांना बोलावून घेतले. एका रांगेत सर्व पालकांना बसविण्यात आले. मुलींनी आईवडिलांचे पूजन केले. फुलांचे हार घालून पूजन केले. गोदानगर शाळेच्या परिसरात सर्व अनुसूचित जमातीचे रहिवाशी असल्याने दिवस उगवल्यानंतर दुसºयाच्या बांधावर कामासाठी जातात, सांस्कृतिक परंपरांपासून काहीशे दूर असलेल्या गावात आईवडील यांचे पूजन करण्यात आले हा अनोखा उपक्र म राबविण्यात आल्याने नागरिकांनी कौतुक केले. शाळेत सर्व मुले आईवडिलांच्या पाया पडून दर्शन घेतले. श्याम जोंधळे, गणेश कातकाडे, माणिक वाघ, मल्हारी वाघ, ज्ञानेश्वर कुठे, नंदू कुटे, शिक्षक सरिता वाणी, धनराज भदाळे, एस. महालपुरे सर्व विद्यार्थी माता पालक उपस्थित होते.