शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या सर्वाधिक रणरागिणी

By admin | Updated: February 25, 2017 01:28 IST

पंचायत समिती : विजयी महिलांमध्ये सर्वाधिक आणि सर्वात कमी मते

संजय दुनबळे : नाशिकजिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांमध्ये विजयी झालेल्या एकूण ७६ महिला उमेदवारांमध्ये सर्वाधिक आणि सर्वात कमी मते मिळवून विजयी होण्याचे दोन्हीही विक्रम शिवसेनेच्या नावावर जमा  झाले आहेत. येवला तालुक्यातील सावरगाव गणातील शिवसेनेच्या उमेदवार आशाताई कांतीलाल साळवे यांना सर्वाधिक (७९४३),  तर इगतपुरी तालुक्यातील खेड गणातील शिवसेनेच्या उमेदवार  जया रंगनाथ कचरे यांनी सर्वात  कमी (२३०१) मते मिळाली  आहेत. जिल्ह्यातील एकूण १५ पंचायत समित्यांमध्ये निवडून आलेल्या अनेक महिला नवख्या असून, पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांच्या नव्या कारकिर्दीला सुरुवात झाली आहे. पंचायत समित्यांमध्ये महिलांना ५० टक्के राखीव जागा दिल्या गेल्याने ज्यांना शक्य झाले त्या राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी दिली. काही पक्षांना उमेदवारी देण्याची इच्छा असूनही महिला उमेदवार मिळाल्या नाहीत. पक्षीय उमेदवारांबरोबरच अनेक  महिलांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आपले भवितव्य आजमावून पाहिले; मात्र त्यांना विजय मिळाला नाही. केवळ सटाणा तालुक्यातील पठावे दिगर गणातून केदूबाई राजू सोनवणे (६२७२) या अपक्ष उमेदवार विजयी झाल्या. मात्र या अपक्ष उमेदवारांनी घेतलेली मते पक्षीय उमेदवारांना काहीशी अडचणीची ठरली.भाजपा तिसऱ्या क्रमांकावरसर्वाधिक जागा मिळवून जिल्हा परिषदेत सत्तेसाठी दावा सांगणाऱ्या शिवसनेने पंचायत समित्यांमध्ये सर्वाधिक महिला उमेदवार निवडून आणत बाजी मारली असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेच्या सर्वाधिक ३७ महिला विजयी झाल्या आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या १६ महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. भारतीय जनता पक्ष महिला उमेदवारांच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर राहिला असून, या पक्षाच्या १२ महिला विजयी झाल्या आहेत. कॉँग्रेसला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. या पक्षाच्या केवळ पाचच महिला विजयी झाल्या आहेत.