शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशकातील शाळांमध्ये सकाळी अत्यल्प उपस्थिती, दुपारच्या सत्रात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 16:34 IST

राज्यव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक पालकांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविले नाही, तर काही खासगी वाहनचालकांनी शहरातील तणावपूर्ण वातावरण लक्षात घेऊन शाळेर्पयत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा घरी पोहोचविण्याची भूमिका घेतली

ठळक मुद्देनाशिकच्या शाळांमध्ये सकाळी अत्यल्प उपस्थितीदुपारच्या सत्रात शाळांचा सूट्टी देण्याचा निर्णयपालकांनी मुलांना घरी ठेऊन घेतली खबरदारी

नाशिक : भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर अनेक पालकांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविले नाही, तर काही खासगी वाहनचालकांनी शहरातील तणावपूर्ण वातावरण लक्षात घेऊन शाळेर्पयत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा घरी पोहोचविण्याची भूमिका घेतल्याने शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यल्प दिसून आली.भीमा कोरेगावच्या घटनेचे पडसाद नाशिकमध्येही उमटले असून, शहरातील दुकाने व बाजारपेठा बंद असताना शहरातील सकाळच्या सत्रतील शाळा मात्र सुरू होत्या. भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. परंतु या बंदच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शाळा-महाविद्यालयांना कोणतीही सूचना केलेली नसल्याने बुधवारी (दि. 3) शहरातील बहुतांश शाळा सुरू होत्या. परंतु मंगळवारच्या तणावपूर्ण शांततेनंतर शहरातील बंदची स्थिती लक्षात घेऊन अनेक पालकांनी त्यांच्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला, तर काही खासगी वाहनचालकांनी विद्यार्थांना शाळेपर्यत आणल्यानंतर शहरातील स्थिती लक्षात घेऊन पुन्हा घरी सोडण्याचा निर्णय घेतला. काही पालकांनीही अशाच प्रकारे शाळेर्पयत येऊन मुलांना पुन्हा घरी घेऊन जाणे पसंत केले. त्यामुळे बुधवारी शहरातील विविध शाळांमध्ये विद्याथ्र्याची उपस्थिती अत्यल्प होती. तर काही शाळांनी मुख्याध्यापकांच्या अधिकारात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शाळांच्या परिसरात शुकशुकाट दिसून येत आहे.

दुपारच्या सत्रात सुटी

बंदच्या पूर्वसंध्येला शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयांना सुटी नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आल्याने बुधवारी सकाळी शहरातील शाळा- महाविद्यालये सुरू होती. परंतु शहरात कडेकोट बंद पाळण्यात आल्याने दुपारच्या सत्रातील शाळांना सुटी देण्यात आली. त्यामुळे शाळांच्या आवारात दिवसभर शुकशुकाटच दिसून आला.

टॅग्स :SchoolशाळाNashikनाशिकStudentविद्यार्थीagitationआंदोलनBhima-koregaonभीमा-कोरेगाव