चांदवड - शीख धर्माचे धर्मगुरू गुरू तेगबहादूर साहेब यांच्या शहीद दिनानिमित्त रविवारी मंगरूळ येथील गुरु द्वारा चे प्रमुख कुलदीपसिंह यांच्या नेतृत्वाखाली शीख बांधवांच्या वतीने येथे शोभायात्रा काढण्यात आाली.होते.मिरवणुकीचे विसर्जन चंद्रेश्वर पायथ्याजवळ झाले. मिरवणुकी दरम्यान सोमवार पेठेतील मातीच्या गणपती जवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व पगडी गणेश मित्र मंडळाच्या वतीने भाविकांना दूध वाटप करण्यात आले. तर श्रीराम रोड येथे लोहारकर बंधूंच्या वतीने सरबत व पाणी वाटप करण्यात आले .मिरवणुकीत वाहे गुरू जी का खलसा , वाहेगुरू जी की फतेह , अशा घोषणा देत शीख बांधवांनी आपली विविध चित्तथरारक खेळाचे प्रदर्शन केले. यात दानपट्टा (गतका )लाठीकाठी, तलवारबाजी आधी विविध खेळ दाखवले. संत बाबा नरेंद्र सिंह जी, संत बाबा बलविंदर सिंग , बाबा रणजीत सिंग व धर्मगुरू वर ठिक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. मिरवणुकीत सुंदर चा रथ सजवण्यात आला होता. मंगरूळ गुरु द्वारा चे कुलदीप सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली शीख बांधव, भगिनी शोभायात्रेत सहभागी झाले होते. यानिमित्त मंगरुळ येथील गुरु द्वारा येथे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .चांदवड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
चांदवडला शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 17:34 IST
चांदवड - शीख धर्माचे धर्मगुरू गुरू तेगबहादूर साहेब यांच्या शहीद दिनानिमित्त रविवारी मंगरूळ येथील गुरु द्वारा चे प्रमुख कुलदीपसिंह यांच्या नेतृत्वाखाली शीख बांधवांच्या वतीने येथे शोभायात्रा काढण्यात आाली.
चांदवडला शोभायात्रा
ठळक मुद्देमंगरूळ येथील गुरु द्वारा येथे दि.२२ नोव्हेंबर पासून अखंड पाठ, कीर्तन, विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले