Moonlight wrecked warehouse fire | चांदवडला भंगार गुदामास आग
चांदवड येथील भंगार साहित्याच्या गोदामास आग लागली असून आगीने भीषण रुप धारण केल्याचे दिसत आहे.

चांदवड : शहरातील तळवाडे रोडवरील अल्ताफ स्क्रॅप सेंटर नावाच्या भंगार साहित्याच्या गुदामास मंगळवारी मध्यरात्री आग लागून आठ लाखांचे साहित्य भस्मसात झाले.
शकील अजीज बेग यांच्या मालकीचे हे गुदाम आहे. त्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान सोमा टोलनाक्याच्या अग्निशमन पथकाने आग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. यात प्लॅॅस्टिक, रद्दी, पुठ्ठे व भंगाराचे साहित्य जळून खाक झाले. सुमारे दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
अज्ञात व्यक्तीने गुदाम पेटवून दिल्याचा संशय गुदाम मालक व कामगारांनी व्यक्त केला आहे.


Web Title: Moonlight wrecked warehouse fire
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.