शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ््यातही २८० गावांची तहान टँकरवर

By admin | Updated: August 5, 2014 20:27 IST

पावसाळ््यातही २८० गावांची तहान टँकरवर

 

सुनील थोरात

सिन्नरपावसाळा अर्ध्यावर येऊन ठेपला आहे. पश्चिम पट्ट्यातील काही गावांचा अपवाद सोडल्यास गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने तालुक्याला हुलकावणी दिली आहे. परिणामी ४६ गावे व २३३ वाड्या - वस्त्यांना पाणी टंचाईने ग्रासले असून त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी शासनाच्या टँकरवर विसंबून राहण्याची वेळ आहे. पावसाळ््यातील पाणी टंचाईच्या या स्थितीने तालुक्यावरील दुष्काळाचे मळभ अधिक गडद झाले आहे. तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाला नसून यंदा सलग चौथ्यावर्षीही पावसाने पाठ फिरवली आहे. परिणामी तालु्क्यातील विशेषत: पूर्व भागातील सर्वच जलस्रोत कोरडेठाक पडले आहेत. विहिरींना पाणी नसल्याने माणसे व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पावसाळ््यातही गंभीर झाला आहे. त्यामुळे शासनाच्यावतीने टंचाईवर मात करण्यासाठी टँकर सुरु ठेवून ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. मात्र पाऊस झाला नसल्याने शेतकरी व सर्व आघाड्यांवर दुष्काळाचे मळभ गडद झाले आहे. तालुक्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ५५७ मिलिमीटर असून आजपर्यंत सुमारे १३० मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या तालुक्यात १९ शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातून खासगी टँकरला मंजुरी नसल्याने तालुक्यात उन्हाळ््यामध्ये सुरु असलेले ५६ खासगी टँकर बंद करण्यात आहेत. मात्र आजही तालुक्यातील ४६ गावे २३३ वाड्या-वस्त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी १६ टँकर कमी पडत असल्याने आजही ५५ टँकरची गरज आहे. सध्या मंजुर असलेल्या १९ टँकरपैकी सहा टँकर दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले असल्याने आता केवळ १२ टँकरवर या गावांना पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले असून खेपा वाढविण्यात आल्या आहेत. तालुक्यात खरिपाचे ६४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र यंदा या उद्दीष्टापर्यंत पोहोचने अशक्य आहे. कडधान्य वर्गातील तूर, मठ, मूग, उडीद, कुळीद या पिकांच्या पेरणीचा कालावधी संपल्याने यंदा ही पिके होणार नाहीत. पाऊस उशिरा का होईना परंतु समाधानकारक झाल्यास रब्बी हंगामाच्या पेरण्या लवकर केल्या जातील असा अंदाज व्यक्त होत आहे. पावसाअभावी कृषि विभाग व शेतकऱ्यांचे खरिपाचे नियोजनही कोलमडले असून जुलै महिना उलटून गेला तरी अद्याप पेरण्या होऊ शकल्या नाहीत. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील काही गावांमध्ये पेरण्या झाल्या आहेत. मात्र पूर्व भागात पेरण्या झाल्या नाहीत. या भागात कापूस लागवडीवर शेतकऱ्यांनी अधिक भर दिल्याचे दिसून येत आहे. कमी पाण्यावर कापूस तग धरु शकतो. तसेच रिमझिम पाऊस सुरु राहिल्यास बाजरीच्या पेरण्यांकडे शेतकरी लक्ष केंद्रीत करणार आहे. (वार्ताहर)