जिल्हा क्रॉस कंट्री स्पर्धेत मोनिका, दिनेशची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:45 IST2021-02-05T05:45:57+5:302021-02-05T05:45:57+5:30
नाशिक : जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने झालेल्या जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेतील महिलांच्या खुल्या गटात मोनिका आथरे हिने ...

जिल्हा क्रॉस कंट्री स्पर्धेत मोनिका, दिनेशची बाजी
नाशिक : जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने झालेल्या जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेतील महिलांच्या खुल्या गटात मोनिका आथरे हिने तर पुरुषांच्या खुल्या गटात दिनेश प्रसाद याने बाजी मारली.
या स्पर्धेमध्ये १६ वर्षे मुले- मुली, १८ वर्षे मुले-मुली, २० वर्षे मुले-मुली आणि खुला गट पुरुष आणि महिला या चार गटांचा समावेश होता. या स्पर्धेतून विविध गटांसाठी खेळाडूंची नाशिक जिल्ह्याच्या संघामध्ये निवड करण्यात आली आहे. हे खेळाडू ३१ जानेवारी रोजी लोकसेवा शैक्षणिक संस्थेच्या नेताजी सुभाषचंद्र मिलिटरी स्कूल, पुलगाव, हवेली, पुणे येथे आयोजित महाराष्ट्र राज्य क्रॉस कंट्री स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. नाशिकच्या संघामध्ये मोनिका आथरे, पूनम सोनवणे, कांतिलाल कुंभार, कोमल जगदाळे अशा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असल्यामुळे नाशिकचे खेळाडू पुणे येथे आयोजित महाराष्ट्र राज्य स्पर्धेत नाशिकला सर्वसाधारण विजेतेपद मिळवून देतील, असा विश्वास नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे चेअरमन हेमंत पांडे आणि सचिव सुनील तावरगिरी यांनी व्यक्त केला. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आयोजकांतर्फे निवास आणि भोजनव्यवस्था करण्यात येणार आहे तसेच सहभागी खेळाडूंसाठी पुणे स्टेशन, स्वारगेट आणि शिवाजीनगर बस स्टॅण्ड, ते स्पर्धा स्थळ येथे वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे.
स्पर्धेतील विजेते खेळाडू
१६ वर्ष मुले २ किलोमीटर - अजय यादव, कुमार जाधव,
१६ वर्षे मुली २ किलोमीटर - गायत्री दरेकर, रिंकू चौधरी,
१८ वर्ष मुले ६ किलिमीटर - विलास गोळे, संदीप चौधरी.
१८ वर्षे मुली ४ किलोमीटर - वर्षा चौधरी, वनिता बोंबे
२० वर्ष मुले ८ किलोमीटर - दयाराम गायकवाड, शुभम भोसले, अतुल बर्डे,
२० वर्षे मुली, ६ किलोमीटर - गुंजन प्रसाद, वनिता बोंबे.
खुला गट पुरुष - १० किलोमीटर - दिनेश प्रसाद, आदेश कुमार, सुमित गोरे,
खुला गट महिला - १० किलोमीटर - मोनिका आथरे, पूनम सोनुने, कोमल जगदाळे