जुन्या नाशकात महिलेचा विनयभंग; संशयित फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 13:32 IST2018-09-06T13:28:39+5:302018-09-06T13:32:14+5:30

जुन्या नाशकात महिलेचा विनयभंग; संशयित फरार
ठळक मुद्देसंशयिताविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल महिलेचा हात धरून छेडछाड केली.
नाशिक : जुने नाशिक परिसरातील पंचशीलनगर, गंजमाळकडे बाजारात भाजी खरेदीसाठी जात असलेल्या एका महिलेचा संशयित दिलावर शेख याने पाठलाग करुन बळजबरीने संवाद साधत मोबाईल क्रमांक देण्याचा आग्रह धरला पिडित महिलेने त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला असता संशयित शेख याने महिलेचा हात धरून छेडछाड केली. याप्रकरणी पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन भद्रकाली पोलिसांनी संशयिताविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी (दि.५) सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा प्रकार पंचशीलनगर परिसरात घडला. घटनेनंतर संशयित परिसरातून फरार झाला आहे.