नाशिकरोडला तरुणीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 23:59 IST2018-05-08T23:59:46+5:302018-05-08T23:59:46+5:30
नाशिक : स्वयंपाकाचे काम आटोपून सायकलने घरी परतत असलेल्या बावीस वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिला अडवत विनयभंग केल्याची घटना नाशिकरोडच्या गंधर्वनगरी परिसरात घडली़

नाशिकरोडला तरुणीचा विनयभंग
नाशिक : स्वयंपाकाचे काम आटोपून सायकलने घरी परतत असलेल्या बावीस वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिला अडवत विनयभंग केल्याची घटना नाशिकरोडच्या गंधर्वनगरी परिसरात घडली़ सचिन सखाराम गायकवाड (३०, रा. गंधर्वनगरी) असे विनयभंग करणाऱ्या संशयिताचे नाव आहे़ गंधर्वनगरी परिसरात राहणारी युवती गुरुवारी रात्री स्वयंपाकाचे काम आटोपल्यानंतर सायकलने रात्री घरी परतत होती़ या युवतीचा संशयित गायकवाड याने पाठलाग करून अडवून प्रेमाची मागणी करीत तिच्या सायकलला लाथ मारून विनयभंग केला़ तसेच धमकीही दिल्याचे या तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे़