अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; आरोपीला सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 16:26 IST2018-11-22T16:25:44+5:302018-11-22T16:26:51+5:30
६ एप्रिलरोजी त्याने पुन्हा पीडितेला त्र्यंबकरोडवरील एका प्रार्थनास्थळावर अडवून ‘बाहेर फिरण्यास चल’ असे म्हणत बळजबरीने वाहनावर बसविण्याचा प्रयत्न के ला.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; आरोपीला सक्तमजुरी
नाशिक : बालिकेच्या विनयभंगप्रकरणी आरोपी अनिल महादेव रणशूर (२१, परभणी) यास जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुर्यकांत शिंदे यांनी तीन वर्षांची सक्तमजूरी व दोन हजारांच्या दंडाची शिक्षा गुरुवारी (दि.२२) ठोठावली.
पीडित मुलीच्या मागावर आरोपी अनिल हा नेहमी असायचा. एकतर्फी प्रेमप्रकरणातूपन तो अल्पवयीन मुलीवर सातत्याने प्रेम करण्यास दबाव वाढविण्याचा प्रयत्न करत होता. ६ एप्रिलरोजी त्याने पुन्हा पीडितेला त्र्यंबकरोडवरील एका प्रार्थनास्थळावर अडवून ‘बाहेर फिरण्यास चल’ असे म्हणत बळजबरीने वाहनावर बसविण्याचा प्रयत्न के ला. त्यामुळे पीडित मुलगी घाबरली व त्यास नकार देत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता अनिलने तिचा विनयभंग केला. याअगोदर त्याने पीडितेसह तिच्या पालकांना फोनवरून जीवे मारण्याची धमकीदेखील दिली होती. अखेर पीडितेच्या पालकांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन अनिल विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य बघून ‘पोक्सो’ कायद्यानुसार विनयभंगाचा गुन्हा अनिलविरुध्द नोंदविला. याप्रकरणी उपनिरीक्षक बेलेकर यांनी तपास करून अनिलविरोधात दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले. अॅड शिरीष कडवे यांनी सरकारी पक्षाच्या वतीने सात साक्षीदार तपासले. त्यात पीडितेसह तिच्या पालकांसह मुलीची व बेलेकर यांची साक्ष या गुन्ह्यात महत्वाची ठरली. अनिल विरोधात गुन्हा सिध्द झाल्याने न्यायाधीश शिंदे यांनी त्यास तीन वर्षे सक्तमजुरी आणि दंड ठोठावला.