सिन्नरफाटा येथे विवाहितेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:22 IST2019-01-20T00:21:52+5:302019-01-20T00:22:50+5:30
सिन्नरफाटा गोदरेजवाडी येथे विवाहितेच्या घरात दोघेजण बळजबरीने घुसून विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सिन्नरफाटा येथे विवाहितेचा विनयभंग
नाशिकरोड : सिन्नरफाटा गोदरेजवाडी येथे विवाहितेच्या घरात दोघेजण बळजबरीने घुसून विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सिन्नरफाटा गोदरेजवाडी येथे विवाहितेच्या घरी मामसासरे शुक्रवारी दुपारी आले होते. यावेळी संशयित सागर प्रकाश कांबळे (२९), सनी राजेंद्र जानराव (२०) रा. गोदरेजवाडी हे दोघे बळजबरीने विवाहितेच्या घरात घुसले. सागर याने विवाहितेला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. यावेळी दोघा संशयितांनी मामसासरे व इतर नातेवाइकांना शिवीगाळ, दमदाटी केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित कांबळे व जानराव याला पोलिसांनी अटक करून नाशिकरोड न्यायालयासमोर उभे केले असता सोमवार (दि. २१) पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.