इंदिरानगरमधील तरुणीचे अपहरण करून विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 18:16 IST2018-08-19T18:15:39+5:302018-08-19T18:16:14+5:30
नाशिक : इंदिरानगरमधील एका शाळेजवळील तरुणीस वाढदिवस साजरा करण्याचे आमिष दाखवून तिचे दुचाकीवरून अपहरण करून सलग पाच दिवस डांबून ठेवून विनयभंग तसेच दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़

इंदिरानगरमधील तरुणीचे अपहरण करून विनयभंग
नाशिक : इंदिरानगरमधील एका शाळेजवळील तरुणीस वाढदिवस साजरा करण्याचे आमिष दाखवून तिचे दुचाकीवरून अपहरण करून सलग पाच दिवस डांबून ठेवून विनयभंग तसेच दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीची संशयित रवि बेंडकुळे (रा़ आनंदवली) सोबत ओळख होती़ सोमवारी (दि़१२) या तरुणीचा वाढदिवस असल्याने बेंडकुळे याने ओळखीचा गैरफायदा घेत वाढदिवस साजरा करण्याचे आमिष दाखवून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मांजरमाळ (हरसूल) येथे मावशीच्या घरी घेऊन गेला़
यानंतर १५ आॅगस्टच्या मध्यरात्री या तरुणीस झोपेतून उठवत तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असे म्हणून तिचा विनयभंग केला़ यानंतर १७ आॅगस्ट रोजी या मुलीचा हात पिरगाळून तोंड दाबत ओरडल्यास डोंगरावरून फेकून देईल, अशी धमकी दिली़
या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून संशयित बेंडकुळे याच्या विरोधात अपहरण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़