महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 00:11 IST2018-06-16T00:11:30+5:302018-06-16T00:11:30+5:30

अल्पवयीन विद्यार्थिनीला बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त करून तिच्या महाविद्यालयात जात तिची बदनामी करून विनयभंग केल्याचा प्रकार सिडकोतील एका महाविद्यालयात घडला आहे़

 Molestation of college girl | महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

नाशिक : अल्पवयीन विद्यार्थिनीला बळजबरीने प्रेमसंबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त करून तिच्या महाविद्यालयात जात तिची बदनामी करून विनयभंग केल्याचा प्रकार सिडकोतील एका महाविद्यालयात घडला आहे़  अंबड पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित गणेश पाटील (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) हा मोबाइलवर फोन करून पाठलागकरीत होता़ यानंतर संशयित पाटील हा गुरुवारी (दि़ १४) महाविद्यालयात आला व त्याने बदनामी करून विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़ या प्रकरणी संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  Molestation of college girl