शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेची फसवणूक करून विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 18:20 IST

नाशिक : पतीला सोडून दे, मी तुझ्यासोबत लग्न करतो, असे अमिष दाखवून एका संशयिताने विवाहित महिलेस तिच्या पतीविरोधात कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल करण्यास भाग पाडले़ यानंतर विवाहितेच्या पतीकडून मिळालेली रक्कम व महिलेचे सोन्याचे दागिने लाटून तिचा विनयभंग केल्याची घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली आहे़ पिडीतेने पैशांची मागणी केली असता या संशयिताने तिच्या दोन मुलींना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने या महिलेने दिपक जिभाऊ ठाकरे (रा. बालाजी रेसीडेन्सी, अशोकनगर, सातपूर) विरोधात गुन्हा दाखल केला आहे़

ठळक मुद्दे पतीविरोधात कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल करण्यास भाग पाडलेपतीकडून मिळालेली रक्कम, सोन्याचे दागिने लाटून विनयभंग

नाशिक : पतीला सोडून दे, मी तुझ्यासोबत लग्न करतो, असे अमिष दाखवून एका संशयिताने विवाहित महिलेस तिच्या पतीविरोधात कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल करण्यास भाग पाडले़ यानंतर विवाहितेच्या पतीकडून मिळालेली रक्कम व महिलेचे सोन्याचे दागिने लाटून तिचा विनयभंग केल्याची घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली आहे़ पिडीतेने पैशांची मागणी केली असता या संशयिताने तिच्या दोन मुलींना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने या महिलेने दिपक जिभाऊ ठाकरे (रा. बालाजी रेसीडेन्सी, अशोकनगर, सातपूर) विरोधात गुन्हा दाखल केला आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी फाटा परिसरात विवाहिता दोन लहान मुलींसमवेत राहते़ जुलै २०१७ मध्ये तिच्या मैत्रिणीने संशयित ठाकरेसोबत ओळख करून देत मोबाईल नंबर दिला़ यानंतर ठाकरे याने विवाहितेस नियमित फोन व बाहेर घेऊन जाऊ लागला़ त्र्यंबकेश्वर येथील हॉटेलमध्ये नेऊन ‘तू, नवऱ्याला सोडून दे मी तुझ्याशी लग्न करतो’ असे अमिष दाखवून पतीविरोधात तक्रार करण्यास सांगितले़ त्यानुसार या विवाहितेने मार्च २०१८ मध्ये पतीविरोधात महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार दाखल केली़ यानंतर पती-पत्नीत वाद झाल्याने ठाकरे याने विवाहितेस पाथर्डी फाटा परिसरात भाडेतत्वावर फ्लॅट घेऊन दिला़

संशयित ठाकरे याने विवाहितेसोबत गोड बोलून तिचा विश्वास संपादन करून तिच्याकडील दीड तोळे सोन्याचे चेन, पाच ग्रॅमची अंगठी कर्ज झाल्याने तात्पुरत्या स्वरुपात परत देण्याच्या बोलीवर घेऊन गेला़ तसेच महिलेच्या पतीने दिलेले एक लाख रुपयांपैकी ९० हजार रुपये काही ना काही कारण दाखवून घेऊन गेला़ यानंतर या महिलेला भेटण्यास टाळाटाळ करून लागल्याने त्यास विचारणा केली असता मारहाण करून तिच्या मुलींना जीवे मारण्याची धमकी दिल्याने तीने इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली़ यावेळी माफी मागून परत त्रास देणार नाही असे सांगून समझोता केला़ यानंतर काही दिवसांनी पुन्हा या विवाहितेस ठाकरे त्रास देऊ लागला व लग्न करणार नाही तसेच पैसेही परत करणार नाही असे म्हणून धमकी देत असल्याने महिलेने संपर्क तोडला़

२२ आॅगस्ट २०१८ रोजी महिला मुलींसोबत घरी असताना ठाकरे हा महिलेच्या घरी गेला तिचा विनयभंग केला, यावेळी महिलेने ओरड केल्याने तो फरार झाला़े दरमयान या प्रकराचा जाब विचारण्यासाठी २७ आॅगस्ट रोजी ही महिला गेली असता संशयित ठाकरे याने पुन्हा धमकी दिली तसेच पैसे परत करणार नसल्याचे सांगितले़ पिडीत महिलेने ही बाब पतीस सांगितली असता त्याने धीर दिल्याने संशयित ठाकरेविरोधात फिर्याद दिली़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकWomenमहिलाMolestationविनयभंग