वाळू तस्कराकडून महिलेचा विनयभंगाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 19:14 IST2019-04-22T19:13:09+5:302019-04-22T19:14:49+5:30
लोहोणेर : येथील वाळू तस्कर व सद्या तडीपारीचे आदेश असलेला स्वप्नील (भैय्या) निकम याने येथील उच्चभ्रू समाजातील एका महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असता या प्रकरणी लोहोणेर गावात सर्वत्र तीव्र पडसाद उमटले असून या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी (दि.२२) लोहोणेर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.

लोहोणेर येथे विनयभंग प्रकरणी आरोपीस अटक होऊन कडक शासन व्हावे म्हणून पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील राजपूत यांना निवेदन देतांना लोहोणेर ग्रामस्थ,
लोहोणेर : येथील वाळू तस्कर व सद्या तडीपारीचे आदेश असलेला स्वप्नील (भैय्या) निकम याने येथील उच्चभ्रू समाजातील एका महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असता या प्रकरणी लोहोणेर गावात सर्वत्र तीव्र पडसाद उमटले असून या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी (दि.२२) लोहोणेर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.
दरम्यान सकाळी येथे जमलेल्या जमावाकडून मिरच्या भैय्या याच्या अतिक्रमीत जागेवर असलेल्या आॅफिसची (पत्र्याच्या शेड) मोडतोड व जाळपोळ करण्यात आली. तसेच पोलीस उप निरीक्षकांची भेट घेऊन भैय्या निकम याला अटक करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
भैय्या निकम याने एका महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या आधी सुद्धा एकदा सदर प्रकार घडला असता त्याची जामिनावर मुक्तता झाली होती. याचा गैरफायदा घेत पुन्हा सदर प्रकार घडल्याने लोहोणेर गावात तीव्र प्रतिक्रि या उमटल्या. व याचा निषेध म्हणून सोमवारी लोहोणेर गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान संतप्त झालेल्या काही जमावाने भैय्या निकम याच्या आॅफिसची (पत्र्याच्या शेड) जेसीबीच्या सह्याने मोडतोड करीत जाळपोळ केली.
या घटनेदरम्यान देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील राजपुत हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी लोहोणेर गावातील संतप्त नागरिकांच्यावतीने संबधित आरोपीस अटक करून कडक शासन करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. दरम्यान दुपारी लोहोणेर गावातील सर्वच व्यवहार सुरळीतपणे सुरू करण्यात आले. या घटनेचा सर्वच स्तरातून कडक शब्दात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.