त्र्यंबकेश्वरला पोलिसांचे मॉकड्रील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 00:53 IST2021-11-18T00:52:25+5:302021-11-18T00:53:53+5:30
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात त्रिपुरा घटनेचे पडसाद उमटत असल्याने त्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक पोलिसांनी बुधवारी (दि.१७) शहरात माॅकड्रील करून शक्तिप्रदर्शन केले.

त्र्यंबकेश्वरला पोलिसांचे मॉकड्रील
ref='https://www.lokmat.com/topics/trimbakeshwar/'>त्र्यंबकेश्वर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात त्रिपुरा घटनेचे पडसाद उमटत असल्याने त्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक पोलिसांनी बुधवारी (दि.१७) शहरात माॅकड्रील करून शक्तिप्रदर्शन केले. पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळे, राणी डफळ, चंद्रभान जाधव या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यातील सर्व २२ पोलीस कर्मचारी आदी माॅकड्रीलमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर पोलीस स्टेशनपासून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, त्र्यंबकेश्वर मंदिर, लक्ष्मी नारायण चौक, पाच आळी, कुशावर्त तीर्थ चौक, तेली गल्ली, चौकीमाथा, सुंदराबाई मठ या भागात संचलन करण्यात आले.