Mocca on the gang of 'that' robber; Mocca hanged around 32 criminal still | ‘त्या’ दरोड्यातील टोळीवर मोक्का; अद्याप ३२ गुंडांभोवती मोक्काचा फास
‘त्या’ दरोड्यातील टोळीवर मोक्का; अद्याप ३२ गुंडांभोवती मोक्काचा फास

ठळक मुद्देचालू वर्षात एकूण ३२ सराईत गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई २० गुंड पोलिसांच्या हाती लागले आहेफरार दरोडेखोरांना बेड्या ठोकण्याचे आव्हान

नाशिक : सातपूर पोलीस ठाणे हद्दीत २४ सप्टेंबर २०१९ रोजी मध्यरात्री एका बॅँकेच्या एटीएम केंद्रावर दरोडा टाकल्याची घटना घडली होती. या घटनेत पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोकड दरोडेखोरांना लांबविता आली नाही. पोलिसांनी पाठलाग करून दोघा संशयित दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. या दोघांसह त्यांच्या चार साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी मोक्काअन्वये कारवाई केली आहे. चालू वर्षात एकूण ३२ सराईत गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. यापैकी २० गुंड पोलिसांच्या हाती लागले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दरोड्याच्या गुन्ह्यात गजानन मोतीराम कोळी, मिलनसिंग रामसिंग भादा या दोघांना पोलिसांनी पाठलाग करून त्याच रात्री ताब्यात घेतले होते. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. कि स्मतसिंग रामसिंग भादा (२०), तलवारसिंग जन्नतसिंग भादा (२०), रामसिंग राजूसिंग जुन्नी (२५), आझादसिंग कृपालसिंग भादा (४५, सर्व रा. मोहाडी, जि.धुळे) या संशयितांची नावे दरोड्यात निष्पन्न झाली. या सहा सराईत दरोडेखोरांनी मिळून पालघर, ठाणे, डहाणू जिल्ह्यांत घरफोडी, दरोड्यासारखे गंभीर गुन्हे केल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलिसांच्या हाती लागलेला मिलनसिंगविरुद्ध १५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, गजाननविरुद्ध ९ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहे. हे गुन्हेगार सराईत असून, संघटितपणे दरोडे, हाणामाऱ्या, जबरी लूटसारखे गुन्हे करत असल्याचे तपासात पुढे आल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केल्याची माहिती नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

फरार दरोडेखोरांना बेड्या ठोकण्याचे आव्हान
सातपूरच्या एटीएम दरोड्यातील फरार संशयित दरोडेखोरांना बेड्या ठोकण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. दोन दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले असले तरीदेखील त्यांचे चौघे साथीदार अद्याप फरार आहेत. हे चौघेही धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांनी राज्यातून काढता पाय घेतल्याने पोलिसांना त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. फरार दरोडेखोरांच्या मागावर पोलीस असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल, असे उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

Web Title: Mocca on the gang of 'that' robber; Mocca hanged around 32 criminal still

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.