खंडणीची मागणी करून जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:15 AM2018-05-13T00:15:59+5:302018-05-13T00:15:59+5:30

कर्जाचे काम पूर्ण न झाल्याने दोन लाखाच्या खंडणीची मागणी करून दोघा संशयितांनी एकास जबर मारहाण करून कोंडून ठेवल्याची घटना रविवार कारंजा परिसरातील रेडक्रॉसजवळ घडली़ या प्रकरणी संशयित अमर दरेकर (रा़ रेडक्रॉस, दरेकर सदन, रविवार कारंजा) व त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Mobilize the demand for ransom | खंडणीची मागणी करून जबर मारहाण

खंडणीची मागणी करून जबर मारहाण

Next

नाशिक : कर्जाचे काम पूर्ण न झाल्याने दोन लाखाच्या खंडणीची मागणी करून दोघा संशयितांनी एकास जबर मारहाण करून कोंडून ठेवल्याची घटना रविवार कारंजा परिसरातील रेडक्रॉसजवळ घडली़ या प्रकरणी संशयित अमर दरेकर (रा़ रेडक्रॉस, दरेकर सदन, रविवार कारंजा) व त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  सरकारवाडा पोलीस ठाण्यात सचिन लुनावत (३५, यशवंत पार्क, आदर्शनगर, रामवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (दि़११) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास संशयित दरेकर व त्याच्या मित्राने संगनमत करून सोहन सिस्टीम दुकानात बोलावून घेतले़ यानंतर बबन भोसले यांच्या कर्जाच्या कामाबाबत विचारणा करून ते पूर्ण न झाल्याने दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली़  मात्र, पैसे देण्यास लुनावत यांनी नकार देताच या दोघांनी त्यांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून फ्रॅक्चर केले, तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन कोंडून ठेवले़ तसेच वकिलांकडून दोन लाख रुपये उसनवार घेतल्याचे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बळजबरीने लिहून घेतले़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खंडणी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Mobilize the demand for ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.