अभियांत्रिकीचा विद्यार्थीच निघाला मोबाइल चोर गुन्हा दाखल : प्रशिक्षणार्थींचे चोरले मोबाइल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:54 IST2017-12-03T00:54:03+5:302017-12-03T00:54:55+5:30

आडगाव शिवारातील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ़ वसंतराव पवार वैद्यकीय रुग्णालय व संशोधन संस्थेत शिक्षण घेणाºया प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे महागडे मोबाइल चोरणाºया एकास आडगाव पोलिसांनी अटक केली आहे़

Mobile Thieves Filed In: Engineer Stole Mobile | अभियांत्रिकीचा विद्यार्थीच निघाला मोबाइल चोर गुन्हा दाखल : प्रशिक्षणार्थींचे चोरले मोबाइल

अभियांत्रिकीचा विद्यार्थीच निघाला मोबाइल चोर गुन्हा दाखल : प्रशिक्षणार्थींचे चोरले मोबाइल

ठळक मुद्देचोरीचे तीन मोबाइल जप्त मोबाइल चोरीची कबुली

पंचवटी : आडगाव शिवारातील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ़ वसंतराव पवार वैद्यकीय रुग्णालय व संशोधन संस्थेत शिक्षण घेणाºया प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे महागडे मोबाइल चोरणाºया एकास आडगाव पोलिसांनी अटक केली आहे़ गौरव प्रकाश खैरनार असे या मोबाइल चोरट्याचे नाव असून, विशेष म्हणजे तो क़ का़ वाघअभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आहे़ पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे तीन मोबाइलही जप्त केले आहेत़
डॉ़ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाजवळ प्रशिक्षणार्थी डॉक्टर विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे़ सुमारे दीड महिन्यापूर्वी संशयित गौरव खैरनार (रा़ मातृदर्शन सोसायटी, आडगाव, मूळ रा़ सटाणा) याने वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहातील तीन प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे महागडे मोबाइल चोरून नेले होते़ ही चोरी करताना खैरनार हा सीसीटीव्हीत कैद झाला होता़ त्या आधारे आडगाव पोलीस संशयिताचा शोध घेत असतानाच गौरव खैरनारला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने मोबाइल चोरीची कबुली दिली़ पोलिसांनी संशयित खैरनार यास अटक केली असून, त्याच्याकडून ३९ हजार रुपये किमतीचे तीन मोबाइलही जप्त करण्यात आले आहेत़ दरम्यान, तो अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्ग मेकॅनिकलचा विद्यार्थी असून, सद्यस्थितीत पोलीस कोठडीत असल्याची माहिती आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी दिली़ दरम्यान, सधन घरातील मुलांकडून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून, चिंताजनक बनले आहे. त्यामुळे पालकांच्या जबाबदारीकडेही पोलिसांनी लक्ष वेधले आहे.

Web Title: Mobile Thieves Filed In: Engineer Stole Mobile

टॅग्स :Policeपोलिस