अभोण्यात मोबाइल दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:19 IST2018-04-22T00:19:41+5:302018-04-22T00:19:41+5:30

येथे एकाच रात्री तीन ठिकाणी चोरीचा प्रकार घडला असून, मोबाइल शॉपीचे शटर वाकवून दुकानातील रोख रकमेसह महागडे मोबाइल लांबविले, तर अन्य दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला. शुक्रवारी (दि.२०) मध्यरात्रीच्या सुमारास मेनरोडवरील रितेश शिवदास पवार यांच्या मोबाइल शॉपी दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला.

A mobile shop was opened in Abovea | अभोण्यात मोबाइल दुकान फोडले

अभोण्यात मोबाइल दुकान फोडले

अभोणा : येथे एकाच रात्री तीन ठिकाणी चोरीचा प्रकार घडला असून, मोबाइल शॉपीचे शटर वाकवून दुकानातील रोख रकमेसह महागडे मोबाइल लांबविले, तर अन्य दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला. शुक्रवारी (दि.२०) मध्यरात्रीच्या सुमारास मेनरोडवरील रितेश शिवदास पवार यांच्या मोबाइल शॉपी दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला.  गल्ल्यातील रोख रक्कम व महागडे मोबाइल असा लाखोंचा ऐवज चोरी करून नेला. दरम्यान अभोणा-कनाशी रस्त्यावरील एका घरात तसेच अभोणा-चणकापूर रस्त्यावरील एका दुकानात ही चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला.  या घटनेने अभोणेकर भयभीत झाले आहेत. दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी देवीदास पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकासह ठसेतज्ज्ञ सहायक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन हाताचे ठसे मिळविले आहेत. या घटनेबाबत तीन संशयिताना अभोणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला व पोलीस उपनिरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने दोन पथक तपासकामी रवाना झाले आहेत. अधिक तपास नितीन गांगुर्डे, सचिन गोसावी, नीलेश शेवाळे, हेमंत भुजबळ करीत आहेत.

Web Title: A mobile shop was opened in Abovea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.