महिलेच्या हातातील मोबाइल खेचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:09 IST2018-07-29T23:34:40+5:302018-07-30T00:09:20+5:30
पायी जाणाऱ्या महिलेच्या हातातील मोबाइल दुचाकीवरील संशयितांनी खेचून नेल्याची घटना शनिवारी (दि़२९) रात्रीच्या सुमारास घडली़ नाशिकरोड तरणतलाव परिसरातील रहिवासी अनिता देवरे या रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास मेहता शाळेसमोरून पायी जात होत्या़ यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी त्यांच्या हातातील महागडा मोबाइल फोन खेचून नेला़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

महिलेच्या हातातील मोबाइल खेचला
नाशिक : पायी जाणाऱ्या महिलेच्या हातातील मोबाइल दुचाकीवरील संशयितांनी खेचून नेल्याची घटना शनिवारी (दि़२९) रात्रीच्या सुमारास घडली़ नाशिकरोड तरणतलाव परिसरातील रहिवासी अनिता देवरे या रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास मेहता शाळेसमोरून पायी जात होत्या़ यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी त्यांच्या हातातील महागडा मोबाइल फोन खेचून नेला़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दुचाकीची चोरी
कामटवाडा येथील रहिवासी सुरेश आनंदा शिंदे यांची २५ हजार रुपये किमतीची पॅशन प्रो दुचाकी (एमएच १५ डीटी २४१५) दुचाकी चोरट्यांनी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरून नेली़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीनगरमध्ये घरफोडी
बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी हजारो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़२७) मध्यरात्री शिवाजीनगरमध्ये घडली़ निगळ पार्कमधील भाग्यलक्ष्मी अपार्टमेंटमधील रहिवासी दिनेश निर्मळ यांच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला़ यानंतर कपाटातील दहा हजार रुपयांची सोन्याची अंगठी, तीन हजार रुपयांची हार्डडिक्स, दोन हजार रुपयांचे घड्याळ, दीड हजार रुपयांची पॉवरबँक असा सोळा हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.