मनसे प्रणित आकांक्षा सामाजिक संस्थेतर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 01:13 IST2018-05-01T01:13:51+5:302018-05-01T01:13:51+5:30

महाराष्ट्र व कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला मनसे प्रणित आकांक्षा सामाजिक संस्थेतर्फे वृद्धाश्रमातील वयोवृद्धांची सेवा शुश्रूषा करणाऱ्या दिलासा केअर सेंटर व निसर्ग केअर सेंटर येथील एकूण ३० कर्मचाºयांचा सत्कार करण्यात आला.

MNS fondly honored by Aakanksha Samajik Sanstha | मनसे प्रणित आकांक्षा सामाजिक संस्थेतर्फे सत्कार

मनसे प्रणित आकांक्षा सामाजिक संस्थेतर्फे सत्कार

इंदिरानगर : महाराष्ट्र व कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला मनसे प्रणित आकांक्षा सामाजिक संस्थेतर्फे वृद्धाश्रमातील वयोवृद्धांची सेवा शुश्रूषा करणाऱ्या दिलासा केअर सेंटर व निसर्ग केअर सेंटर येथील एकूण ३० कर्मचाºयांचा सत्कार करण्यात आला.  दिलासाचे संचालक उज्ज्वला जगताप, सतीश जगताप, ‘निसर्ग’चे संचालक सविता गायकवाड व अमोल गायकवाड यांचाही सत्कार करण्यात आला. सत्कारार्थींनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ज्येष्ठांची सेवा ही पुढील भावी पिढीला मिळणारी आशीर्वादाची अनमोल शिदोरी आहे, असे सांगितले. याप्रसंगी माजी नगरसेवक अर्चना जाधव, जयश्री हिंगे, संगीता खैरनार, मयूर तुपे, खुशबू कोठावदे, अंकिता बधान आदी उपस्थित होते.

Web Title: MNS fondly honored by Aakanksha Samajik Sanstha

टॅग्स :MNSमनसे