आमदारांनी केली जिवाला धोका असल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 23:13 IST2021-09-13T23:11:29+5:302021-09-13T23:13:28+5:30
मालेगाव : माजी नगरसेवक रिजवान खान यांच्या घरावरील गोळीबार प्रकरणाची निपक्षपणे सखोल चौकशी करावी, आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्यासह समर्थकांच्या जीवितास धोका असल्याची तक्रार स्वत: आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल, डॉ. खालीद परवेझ, मुस्तकिम डिग्नीटी, रिजवान खान आदींच्या शिष्टमंडळाने अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांची भेट घेऊन केली आहे.

आमदारांनी केली जिवाला धोका असल्याची तक्रार
मालेगाव : माजी नगरसेवक रिजवान खान यांच्या घरावरील गोळीबार प्रकरणाची निपक्षपणे सखोल चौकशी करावी, आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्यासह समर्थकांच्या जीवितास धोका असल्याची तक्रार स्वत: आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल, डॉ. खालीद परवेझ, मुस्तकिम डिग्नीटी, रिजवान खान आदींच्या शिष्टमंडळाने अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांची भेट घेऊन केली आहे.
गेल्या आठवड्यात माजी आमदार रशीद शेख यांनी पत्रकार परिषदेत हल्लेखोर फायरिंगला जाताना विचारून गेले असते तर वेगळे काही घडले असते, असे विधान केले होते. तसेच डॉ. परवेझ, शान-ए-हिंद, मुस्तकिम डिग्नीटी, मौलाना मुफ्ती मो. इस्माइल यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी शिष्टमंडळाने अपर पोलीस अधीक्षक खांडवी यांची भेट घेऊन प्रा. खान यांच्या २२ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री घरावरील गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करावी. या प्रकरणात दोघा संशयितांसह माजी आमदार रशीद शेख यांच्या भावावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पोलिसांनी निपक्षपातीपणे चौकशी करावी. शहरात गुंडागर्दी वाढली आहे. विद्यमान आमदारांच्या समर्थकांच्या जीवितास धोका असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.